डॅशिंग महिला वन परिक्षेत्र अधिकाऱ्याची गोळी झाडुन आत्महत्या; मृत्यूपूर्वी केला पतीला फोन.

अमरावती दि. 25 मार्च – मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गुगामल वन्यजीव विभागाच्या डॅशिंग महिला अधिकारी म्हणून ओळख असलेल्या हरीसाल येथील महिला वन परिक्षेत्र अधिकारी (Forest Range Officer) दिपाली चव्हाण यांनी गोळी झाडून आत्महत्या केली. गुरूवारी सायंकाळी 7 वाजता सरकारी बंगल्यात आपल्या बंदुकीच्या गोळ्या झाडून आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी पतीला फोन करत लवकर या म्हणत शेवटचे बघण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र त्यांनी तत्पुर्वीच आपली जीवनयात्रा संपवली. त्यांनी सुसाईट नोट (suicide note) लिहित वरिष्ठ अधिकाऱ्याच्या त्राला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे नमुद केले आहे.
(Dashing female forest ranger shot dead; Call her husband before she dies.)
रेल्वे गाडीत बसून डिंक तस्कर पळून गेल्यावर दुचाकीद्वारे मध्यप्रदेशपर्यंत पाठलाग करत आरोपींना सळो की पळो करुन सोडणार्या आणि लेडी सिंघम म्हणून ओळखल्या जाणार्या वनपरिक्षेत्र अधिकारी (Forest Range Officer) दिपाली चव्हाण (वय 28 वर्ष) यांनी हरिसाल येथील शासकीय निवासस्थानी स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या (Suicide) केली. ही घटना गुरूवार रात्री 7 वाजताच्या दरम्यान घडली. धारणी तालुक्यातील हरिसाल येथे व्याघ्र प्रकल्पाच्या शासकीय घरात दिपाली चव्हाणचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली. घटना उघड झाल्यानंतर तब्बल दीड तास कोणालाच घरात प्रवेश करु देण्यात न आल्याने उलट सुलट चर्चा सुरु होती. दिपाली यांनी त्यांच्याजवळ असलेल्या शासकीय बंदुकीतल्या गोळ्या स्वतःच्या छातीवर मारून घेतल्या, अशी माहिती आहे. त्या गर्भवती असल्याचीही माहिती समोर आली आहे.
स्वभावाने हसमुख व आधुनिक विचारांच्या दिपाली आत्महत्या करुच शकत नाही, असा अंदाज परिचितांनी वर्तविला आहे. एका माहितीप्रमाणे, दिपालीला एक उच्चपदस्थ वन अधिकारी नेहमी अपमानास्पद वागणूक देत होते. दोन-चार दिवसांपूर्वी ते अधिकारी येऊन गेले, त्यावेळी दिपालीला त्यांनी झापल्याची माहिती आहे. मृत्यूपूर्वी दिपाली यांनी सुसाईड नोट (suicide note) लिहून ठेवली आहे. त्यात वरिष्ठ अधिकाऱ्याच्या त्राला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे नमुद केले आहे. मृतकाच्या घरीचे घटनेच्या वेळी कोणीच नव्हते.
दिपाली यांनी धुळघाट रेल्वे येथे असताना सालई डिंक तस्करांना नामोहरम केले होते. हरिसाल येथे रोरा, मांग्या व मालुर या तीन गावांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी भरीव कामगिरी केली होती. सोमवारीच दिपाली यांनी प्रा. आ. केंद्रात कोरोना प्रतिबंधक लस घेतली होती. घटनेची माहिती मिळताच आमदार राजकुमार पटेल तथा उपविभागीय पोलिस अधिकारी संजय काळे यांनी घटनास्थळी भेट दिली.
धारणी येथून २५ किमी अंतरावरील हरिसाल येथे दीपाली चव्हाण या गुगामल वन्यजीव विभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी त्यांनी अनेक नातेवाइकांशी फोनद्वारे संवाद साधला. त्यानंतर चिखलदरा येथील कोषागार कार्यालयात कार्यरत पती राजेश मोहिते यांच्याशी संपर्क साधला. तुम्ही लवकर या, खिचडी करते, असा संवाद त्यांच्यात झाला. लगेचच, तुला शेवटचे पाहायचे आहे, असे म्हणून त्यांनी पतीला लवकर येण्यास सांगितले. त्यामुळे मोहिते हादरुन गेले हादरले.
मोहित यांनी लगेचच दीपाली यांच्या आईला फोन केला. त्यांच्या आईने मुलगी दीपाली यांच्याशी वारंवार संपर्क साधला. मात्र, पलीकडून फोनला प्रतिसाद न मिळाल्याने मोहिते यांनी तातडीने हरिसाल येथील एम.एस. बिरगोने, ज्योती बिरगोने, संजीव डिकार व महिला वनरक्षक बिसनन यांच्याशी संपर्क साधून त्यांना शासकीय निवसास्थानी जायला सांगितले. ते गेले असता, क्वार्टरची दारे आतून बंद होती. दार तोडून आत गेल्यावर दीपाली चव्हाण या रक्तबंबाळ अवस्थेत पलंगावर कोसळलेल्या स्थितीत आढळून आल्या. त्यांची रिवॉल्वरदेखील बाजूला पडलेली होती. त्यांनी छातीच्या उजव्या भागावर गोळी झाडून आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. माहिती मिळताच वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. दरम्यान वरिष्ठ वनअधिकाऱ्यांच्या मानसिक त्रासामुळे दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या (Suicide) केल्याची चर्चा होत आहे.