बीड जिल्ह्यात ‘ही’ दुकाने उघडण्यास परवानगी; सकाळी 11 ते सायंकाळी 7 वेळेची मुभा.

बीड दि.21 मे – बीड (Beed) जिल्ह्यातील खते बि-बियाणे फर्टी लायजर दुकाने कडक लॉकडाऊन (lockdown) काळात उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर (Jaydatta Kshirsagar) यांनी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्याशी चर्चा करून निवेदनाद्वारे केली होती. क्षीरसागर यांची मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य करत त्यानुसार ठोक कृषी विक्रेत्यांना 21 ते 25 मे दरम्यान सकाळी 11 ते सांयकाळी 7 वाजेपर्यंत मुभा दिली आहे.
(Permission to open ‘These’ shops in Beed district; 11 a.m. to 7 p.m.)
यंदा पावसाळी हंगाम हा चांगला होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असून या वर्षी खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात सोयाबीन, कापूस, तुर, मका, उडीद, मुग आदी पिकांची लागवड करण्यात येते. जुन महिन्यात वेळेवर पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
शेतकऱ्यांना बि-बियाणे व खते खरेदीसाठी बीड जिल्ह्यातील खतांची दुकाने उघडी ठेवणे गरजेचे असून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना बि-बियाणे व खते खरेदी करण्यासाठी वेळ मिळेल या बाबत जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मागणी असून शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात यावी.अशी सूचना व मागणी माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप (Ravindra Jagtap) यांच्याकडे केली होती. त्यानुसार शुक्रवारी जिल्हाधिकारी यांनी आदेश देऊन ही मागणी मंजूर केली आहे.
आता 21 ते 25 मे दरम्यान सकाळी 11 ते सांयकाळी 7 वाजेपर्यंत कृषी विक्रेत्यांना कार्यालयीन कामकाज व ठोक कृषी निविष्ठा विक्री करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. खरीप हंगामाचा कालावधी पाहता व पेरणीचा काळ हा जवळ येत असून शेतकऱ्यांना बि – बियाणे व खते खरेदी करणे अत्यंत आवश्यक आहे.
शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता अशी मागणी माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर (Jaydatta Kshirsagar) यांनी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप (Ravindra Jagtap) यांना निवेदनाद्वारे केली होती. ती जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केली आहे. त्यानूसार दि.21 ते 25 मे या कडक लॉकडाऊन (lockdown) काळातही कृषी विषयक आस्थापना सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे.