कोविड सेंटर मधून 22 रुग्ण पळाले; बीड जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार.

बीड दि.24 मे – सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपचार केल्या जाणाऱ्या कोविड केयर सेंटर (Covid care center) मधून सात दिवसात तब्बल 22 बाधित रुग्णांनी पळ काढल्याची धक्कादायक घटना बीड (Beed) जिल्ह्यातील शिरुर कासार (Shirur Kasar) येथे उघडकीस आली आहे. सात दिवसात एक, दोन करून पळून जाणाऱ्या या लोकांवर गुन्हा दाखल झाला आहे.
(22 patients escaped from the Covid Center; Shocking type in Beed district.)
बीड (Beed) जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर तालुका पातळीवर कोविड केयर सेंटर सुरू करण्यात आली आहेत. शिरूर कासारच्या (Shirur Kasar) शासकीय वसतिगृहात कोविड केयर सेंटर आहे. सौम्य लक्षण असलेली किंवा फार त्रास नसलेल्या कोरोना बाधित (Corona Positive) रुग्णांना या ठिकाणी ठेवून उपचार केले जातात .
या कोविड सेंटरमधून 14 ते 21 मे या सात दिवसात तब्बल 22 कोरोना बाधित (Corona Positive) रुग्णांनी पळ काढल्याचे समोर आले आहे. शिरूर, बावी, आनंदगाव, घोगस पारगाव, पौंडुल, जांब, मानूर, हिवरसिंगा, झापेवाडी, दगडवाडी, नारायनवाडी या गावातील हे रुग्ण आहेत. या रुग्णांनी उपचार अर्धवट सोडून परस्पर पळ काढला आहे.
रुग्ण कोविड केयर सेंटरमधून (Covid care center) जात असताना मात्र येथील कर्मचारी काय करत होती असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी पवार यांनी चार दिवसांपुर्वी आष्टीत धडक कारवाई केली होती. यानंतर इतर कोविड केअर सेंटरमधील धक्कादायक प्रकार समोर येत आहेत.
कोविड केअर सेंटर मधील डॉक्टर आणि स्टाफ वर या लोकांची काळजी घेण्याची जबाबदारी असताना ते कर्तव्य पार पाडताना किती बेजबाबदारपणे वागत आहेत हे यावरून दिसुन येत आहे. या प्रकरणी पळ काढणाऱ्या रुग्णांवर गुन्हा दाखल झाला आहे मात्र निष्काळजीपणा करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर देखील कारवाई होणे आवश्यक आहे. मात्र या प्रकरणी हलगर्जीपणा आणि कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी संबंधित यंत्रणेवर कोणतीच कारवाई झाली नाही हे विशेष.