माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडमध्ये 1388 पदांसाठी भरती; नोकरीची सुवर्णसंधी.

मुंबई दि.18 जून – माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडमध्ये (Mazagon Dock Shipbuilders Limited) एकुण 1388 पदांसाठी भरती (Recruitment) प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. माझगाव डॉक शिपबिल्डर्स ही कंपनी केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालया अंतर्गत येते. भारतीय नौदलासाठी जहाजबांधणीचं काम माझगाव डॉक शिपबिल्डर्सकडून केलं जातं. पात्र भारतीय नागरिकांकडून 1388 जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. एकूण 24 प्रकारच्या पदासांठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे.
(Recruitment for 1388 posts in Mazgaon Dock Shipbuilders Limited; A golden opportunity of a job.)
कसा करणार अर्ज दाखल ?
माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडमध्ये (Mazagon Dock Shipbuilders Limited) 1388 जागांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी https://mazagaondock.in या वेबसाईटला (Website) भेट द्यावी. तिथे करिअर या लिंकवर क्लिक करा, पुढे ऑनलाईन रिक्रुटमेंट (Online Recruitment) त्यानंतर पुढे नॉन एक्झ्युकेटिव्ह पदांवर क्लिक करा. यानंतर आवश्यक ती सर्व माहिती भरुन नोंदणी करा. यांतर तुम्हाला ईमेल प्राप्त होईल. यानंतर युझरनेम आणि पासवर्डद्वारे लॉगीन करा तुम्ही ज्यापदासाठी अर्ज करणार आहात. त्या पदासाठी असणारी पात्रता पाहून अर्ज दाखल करा.
पदाचे नाव आणि संख्या
एसी रेफ मेकॅनिक: 05
कॉम्प्रेसर अटेंडंट: 05
कारपेंटर: 81
चिपर ग्राईंडर: 13
कॉम्पोझिट वेल्डर्स: 132
डिझेल क्रेन ऑपरेटर: 05
डिझेल कम मोटर मेकॅनिक: 04
ज्यु. ड्राफ्टमन: 54
इलेक्ट्रिशयन: 204
इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक: 55
फिटर: 119
ज्यूनिअर क्वालिटी इन्स्पेक्टर: 13
गॅस कटर: 38
मेकॅनिस्ट: 28
मिलराईट मेकॅनिक:10
पेंटर:100
पाईप फिटर 140
रिग्गर: 88
स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर: 125
स्टोअर किपर: 10
यूटिलीटी हँड: 14
प्लॅनर इस्टिमेटर: 008
पॅरामेडिकस: 02
यूटिलीटी हँड : 135
शैक्षणिक पात्रता:
माझगाव डॉक शिपब्लिल्डर्स लिमिटेड द्वारे देण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये वरील पदासांठी पात्रता देण्यात आली आहे. या पदांसाठी विविध पदांनुसार आयटीआय (ITI) प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे.
वयोमर्यादा
18 ते 38 वर्ष वय असणाऱ्या वयोगटातील उमेदवार यासाठी अर्ज करु शकतात. खुल्या, ओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 100 रुपये फी आकारण्यात येईल. 11 जूनपासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून 4 जुलैपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. जुलै महिन्याच्या अखेरिस परीक्षा होण्याची शक्यता आहे. लेखी परीक्षा, ट्रेड टेस्ट आणि अनुभवाच्या आधारे उमेदवारांची तीन वर्षांसाठी निवड केली जाईल. पुढे आणखी दोन वर्ष मुदतवाढ देण्यात येणार आहे. पदानुसार 13200 ते 64360 रुपयांपर्यंत पगार देण्यात येईल.
अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट https://mazagaondock.in या वेबसाईटला (Website) भेट द्यावी.