पॉझिटीव्हीटी दर उतरला… धारुर व पाटोदात वाढ; बीड जिल्ह्यातील आजचे कोरोना अपडेट…

बीड दि.28 जून – बीड (Beed) जिल्ह्यात आज 3626 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 129 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 3497 जण निगेटिव्ह आली आहेत. काल रविवारी तपासणी अहवाल जास्त असताना पॉझिटीव्ह रुग्ण संख्या कमी आल्यामुळे रविवारी पॉझिटीव्हीटी दर अडीच टक्क्यावर आला होता. आजही समाधानकारक संख्या आहे. धारुर व पाटोदा तालुक्यात मात्र संख्या वाढली आहे.

(Positivity rate dropped … Today’s corona update in Beed district …)

तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी….
बीड-8, अंबाजोगाई-5, आष्टी-30, धारुर-14, गेवराई-10, केज-4, माजलगाव-4, परळी-5, पाटोदा-36, शिरुर-8, वडवणी-5 अशी आहे.

बीड (Beed) जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात कोरोना बाधितांच्या (Corona Positive) संख्येत सतत चढ उतार होत असल्याचे चित्र आहे. महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यात तिसऱ्या स्तरावरचेच निर्बंध आजपासून लागू करण्यात आली आहेत. सायंकाळी 4 पर्यंत सर्व व्यवहार सुरळीत राहणार आहेत. तर 5 वाजल्यानंतर सकाळी 7 पर्यंत संचारबंदी असणार आहे.

दरम्यान, राज्यात (Maharashtra Corona) रविवारी दिवसभरात एकूण 9 हजार 974 नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. राज्यातील कोरोना रुग्णसंख्येचा आकडा हा दहा हजाराच्या खाली आहे. पण या आकड्यात दररोज वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे हा आकडा लवकरच 10 हजारांचा टप्पा पार करण्याची भिती आहे. राज्यात दिवसभरात 8 हजार 562 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आतापर्यंत एकूण 57 लाख 90 हजार 113 जणांनी कोरोनावर मात केली आहे. राज्याचा सध्याचा रुग्ण बरे होण्याचा दर (Recovery Rate) हा 95.91 % इतका झाला आहे. तर आज कोरोनामुळे मृत्यूच्या संख्येत काहीशी घट झाली आहे. राज्यात गेल्या 24 तासात 143 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्राचा मृत्यूदर 2.0% इतका झाला आहे. सध्या राज्यात 6 लाख 19 हजार 168 व्यक्ती होम क्वारटाईन आहेत. तर 4 हजार 240 व्यक्ती संस्थातमक विलिगीकरणात आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!