मोठी बातमी… भाजप आमदारांचा विधानसभेत राडा; बारा आमदार वर्षभरासाठी निलंबित.

मुंबई दि. 05 जुलै – पावसाळी अधिवेशनात (monsoon season Maharashtra) ओबीसी आरक्षणाच्या (OBC reservation) मुद्यावरून मोठा राडा पाहण्यास मिळाला. भाजपच्या आमदारांनी जोरदार राडा घालत सभागृहात गोंधळ घातला. विधानसभा अध्यक्षाच्या दालनात भाजप (BJP) आणि महाविकास आघाडीच्या (MVA government) आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली आहे. विधानसभेतील गदारोळ प्रकरणी भाजपच्या 12 आमदारांचे आज निलंबन करण्यात आले.
(Radha of BJP MLAs in the Assembly; Twelve MLAs suspended for a year.)
ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून राष्ट्रवादीचे आमदार आणि मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी (OBC reservation) केंद्र सरकार इम्पेरीकल डाटा उपलब्ध व्हावा तसा ठराव मांडला. पण बोलू न दिल्यामुळे भाजपच्या आमदारांनी जोरदार गोंधळ घातला. छगन भुजबळ यांनी ठराव मांडला त्यावर, अध्यक्षपदी बसलेले भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) ऐकत नसल्याने देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी हेडफोन सभागृहात खाली फेकून दिला.
भाजपा आमदार सभागृहात गोंधळ घातला. भाजप आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे धाव घेतली आणि माईक खेचण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सभागृह 15 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) दालनकडे जात होते, तेव्हा भाजपच्या आमदारांनी त्यांना घेराव घातला.
या प्रकारावर सत्ताधाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून गोंधळी आमदारांवर कारवाईची मागणी केली आहे. तर, सभागृहात धक्काबुक्की झालीच नसल्याचा दावा भारतीय जनता पक्षाने केला आहे.
या आमदाराचे निलंबन…
संजय कुटे, गिरीश महाजन, अतुल भातखळकर, राम सातपुते, अभिमन्यू पवार, जयकुमार रावत, अशिष शैलार, नारायण कुचे, पराग अळवणी, हरीश पिंपळे यांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले.