दहावीचा निकाल जाहिर; मुलींची बाजी… कोकण सर्वाधिक तर नागपूरचा निकाल सर्वात कमी.

मुंबई दि. 16 जुलै – परीक्षा न झालेल्या दहावीचा निकाल अखेर जाहीर (SSC results) झाला असून मुल्यांकनानूसार (Evaluation) जाहिर झालेल्या या निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. महाराष्ट्रात कोकण विभागाचा सर्वाधिक 100 टक्के निकाल लागला असून सर्वात कमी निकाल नागपूर जिल्ह्याचा लागला आहे. शिक्षण मंडळाची पत्रकार परिषद (Press conference) होवून मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी निकालासंदर्भात माहिती दिली.
(SSC results announced; Girls’ bet … Konkan has the highest result and Nagpur has the lowest result.)
कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेच्या (Second Wave of corona) प्रादुर्भावामुळे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 10वीच्या परीक्षा होऊ शकल्या नाहीत. विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या (Evaluation) आधारे दहावीचा निकाल (SSC results) तयार करुन आज ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात आला. आज शिक्षण मंडळाची पत्रकार परिषद (Press conference) पार पडली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी निकालासंदर्भातली माहिती दिली आहे.
कोकण विभाग 100%
यंदाची निकालाची टक्केवारी 99.95 टक्के आहे. कोकण विभागाचा सर्वाधिक 100 टक्के निकाल लागला असून सर्वात कमी निकाल नागपूर जिल्ह्याचा लागला आहे. नागपूर विभागाचा 99.55 टक्के आहे. पूर्नपरिक्षार्थी निकालाची टक्केवारी 90.85 इतकी आहे. 957 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत.
निकालात पुन्हा मुलींची बाजी.
विद्यार्थिनी पुन्हा अव्वल असून मुलींच्या निकालाची टक्केवारी 99.96% इतकी आहे. मुलांची टक्केवारी 99.94% असून राज्यातील 22 हजार 384 शाळांचा निकाल 100 % लागला आहे. 6922 विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवले असून 9 शाळांचा निकाल शून्य टक्के लागला आहे. 27 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल 97.84 टक्के लागला आहे.
असा तपासा 10 वीचा निकाल
निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर http: //result.mh-ssc.ac.in आणि mahahssc board.in जा
-SSC BOARD RESULT या पर्यायावर क्लिक करा.
या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमचा सीट नंबर टाइप करा. सीट नंबर स्पेसशिवाय टाइप करा.
-आईच्या नावाची पहिली तीन अक्षर टाका.
लगेचच तुम्हाला तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
-तुम्हाला तो निकाल डाऊनलोड करता येणार आहे. -विद्यार्थी संदर्भासाठी निकालाचे प्रिंटआउटही काढू शकणार आहेत.