आजपासून अकरावी प्रवेशासाठी CET नोंदणी सुरु; पहा कशी असेल CET परीक्षा.

मुंबई दि.19 जुलै – राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी दहावीचा निकाल (10th Result) लागल्यानंतर अकरावीच्या प्रवेशासाठी CET (Common Entrance Test) प्रवेश परीक्षा घेण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. CET परीक्षा ऑगस्टमध्ये होणार असून याची नोंदणी (Registration) प्रक्रिया आज दि.19 जुलैपासून सुरू होत आहे.
(CET registration for 11th admission starts from today; See what the CET exam will look like.)
विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयात (Junior College) प्रवेश घेण्यासाठी ही परीक्षा असणार आहे. CET परीक्षा म्हणजेच अकरावीची प्रवेश परीक्षा विद्यार्थ्यांसाठी ऐच्छिक असणार आहे. ही परीक्षा पूर्णपणे दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे. या परीक्षेत मिळवणाऱ्या गुणांवरच विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश मिळू शकणार आहे.
एकूण 100 मार्कांची CET परीक्षा.
प्रवेश परीक्षेसाठी 100 गुणांची एकच प्रश्नपत्रिका असणार आहे. परीक्षेचा कालावधी दोन तासांचा असणार आहे. यात इंग्रजी (English), गणित (Maths), विज्ञान (Science) आणि सामाजिक शास्त्र (Social Science) या विषयांवर प्रत्येकी 25 मार्कांचे प्रश्न असणार आहेत. परीक्षेसाठी परीक्षा केंद्रांची यादी राज्य मंडळ किंवा परीक्षा परिषदेमार्फत जाहीर करण्यात येईल.
CET प्रवेश परीक्षा ऑफलाईन
सदरील CET प्रवेश परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं (Offline) घेतली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर जाऊन ही परीक्षा द्यावी लागणार आहे. या परीक्षेतील गुणांच्या आधारावर अकरावीचे प्रवेश निश्चित केले जाणार आहेत.
CET न देणाऱ्या विद्यार्थ्यांचे काय?
जे विद्यार्थी ही प्रवेश परीक्षा देणार नाहीत त्यांना परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनंतर अकरावीत प्रवेश मिळणार आहे. त्यांचं मूल्यमापन (evaluation) हे दहावीच्या गुणांच्या आधारे होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेचं शुल्क भरलंय त्यांच्याकडून CET साठी शुल्क आकारण्यात येणार नाही.