जून्या पिढीतील आदर्श शिक्षिका कालवश; उद्या होणार अंत्यविधी.

किल्लेधारूर दि.4 जानेवारी – शहरातील जून्या पिढीतील शिक्षिका (Teacher) विजयाताई यशवंतराव पटवर्धन (वय 89) यांचे वृध्दापकाळाने निधन झाले.
(The ideal teacher of the older generation; The funeral will be held tomorrow.)
सेवानिवृत्त आदर्श शिक्षिका विजयाताई यशवंतराव पटवर्धन (वय 89) वर्ष यांचे आज वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थीवावर बुधवारी सकाळी पोलीस स्टेशनमागील (Police Station) वैकूठंभुमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
धारूर (Dharur) येथील सरस्वती विद्यालयात अनेक वर्षा सेवा देवून 1992 मध्ये त्या सेवानिवृत्त (retired) झाल्या. आदर्श शिक्षिका म्हणून त्या विद्यार्थीप्रिय होत्या. आज मंगळवारी (दि.4) दुपारी राहत्या घरी निधन झाले.
त्या आदर्श शिक्षीका म्हणून सर्व परिचीत होत्या. त्यांच्या पश्चात मुलगा मुलगी सुन व नांतवडे असा परीवार आहे. जुन्या काळातील एक आदर्शवत शिक्षिका काळाच्या पडद्याआड गेल्या. त्यांच्या निधनामुळे त्यांच्या शिष्यवर्गात हळहळ व्यक्त होत आहे.