बीड जिल्ह्यात गुरुवारी 7 मृत्यू; दोन आठवड्यात 45 कोरोना बळी.

बीड दि.13 अॉगस्ट – देशासह राज्यात कोरोना रूग्णांची (Corona patients) संख्या कमी होत असताना बीड जिल्ह्यात मात्र दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कायम आहे. रोज शंभर ते दोनशे रूग्णसंख्या सापडत असताना आता मृत्युचा आकडाही हळूहळू वाढू लागला आहे. गुरुवारी तब्बल सात कोरोना बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू (Corona death) झाला आहे. मागील 13 दिवसांत मृत्युचा आकडा 45 झाला आहे.

(7 deaths on Thursday in Beed district; 45 corona victims in two weeks.)

बीड (Beed) जिल्ह्यात दोन आठवड्यात 45 कोरोना बाधितांचा (Corona Positive) मृत्यू झाला असल्याची नोंद आरोग्य विभागाकडे करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कोरोना संसर्ग (Corona infection) अद्याप कमी झालेला नसुन अजूनही बाधितांची संख्या शंभर ते दोनशेवर येत आहे. जिल्ह्यात बीडसह आष्टी तालुक्यात बाधितांची संख्या सर्वाधिक आहे. एकीकडे राज्यात निर्बंध (restrictions) शिथिल होवून जनजीवन सुरळीत करण्याचा प्रयत्न शासनाकडून होत असताना बीड जिल्ह्याचा संसर्ग (infection) मात्र आटोक्यात येत नसल्याचे दिसत आहे.

आरोग्य विभागाकडून दररोज कोरोना चाचणीचे प्रमाण वाढवण्यात आले तशी बाधितांची संख्याही वाढत आहे. गुरुवारी जिल्ह्यात 154 नविन कोरोना बाधित आढळून आली आहेत तर 141 रुग्णांची सुट्टी देण्यात आली आहे. जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी रेट (positivity rate) मागच्या दोन दिवसात 2 टक्क्यावर आल्याचे समाधानकारक चित्र दिसत असताना मृत्यूचा आकडा चिंता वाढवणारा आहे. जिल्ह्याचा मृत्यू दर 2.11 टक्के इतका आहे.

बीड जिल्ह्यामध्ये गुरुवारच्या अहवालात 154 कोरोना बाधित आढळून आली आहेत. यात अंबाजोगाई 2, आष्टी 56, बीड 17, गेवराई 12, केज 11, माजलगाव 7, परळी 0, धारूर 8, पाटोदा 16, शिरूर 16, वडवणी 9 अशी रूग्णसंख्या आहे. दिवसभरामध्ये 141 जणांना डिस्चार्ज देण्यात आला तर उपचार घेत असलेल्या सात कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!