बीड जिल्ह्यातील आजची कोरोना बाधितांची संख्या; पहा तालुका निहाय आकडेवारी.

बीड दि.13 अॉगस्ट – आज शुक्रवारी बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे तब्बल 6602 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 119 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 6483 जण निगेटिव्ह आली आहेत.

(Todays corona update in Beed district …. see taluka wise numbers.)

तालुका निहाय आकडेवारी….
बीड-29, अंबाजोगाई-7, आष्टी-42, धारुर-8, गेवराई-3, केज-5, माजलगाव-4, परळी-0, पाटोदा-11, शिरुर-4, वडवणी-6 अशी आहे.

बीड जिल्ह्यात निर्बंध तिसऱ्या लेवलप्रमाणे शिथिल करण्यात आली आहेत. दरम्यान, राज्य सरकारने महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शिथिलता दिली असून आता हॉटेल व्यवसायही रात्री 10 पर्यंत सुरु ठेवण्यात येत आहेत. बीड जिल्हा मात्र यातून वगळलेला आहे. या दरम्यान गुरुवारी जिल्ह्यात कोरोनाचे 7 मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. तर 13 दिवसातील मृत्यूची संख्या 45 अशी आहे.

दरम्यान, राज्यात गेल्या 24 तासांत राज्यात 6 हजार 388 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तर 208 जणांचा आज दिवसभरात मृत्यू झाला आहे. तसेच आज एकूण 8 हजार 390 जणांनी कोरोनावर मात केली असल्याची माहिती, राज्य आरोग्य विभागाने दिली आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण 61 लाख 75 हजार 10 कोरोना बाधित (Corona positive) रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 96.86 टक्के एवढे झाले आहे. आता राज्यातील कोरोना बाधित रूग्णांची एकूण संख्या 63,75,390 झाली आहे. तर सध्या राज्यातील मृत्यू दर 2.11 टक्के एवढा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!