कोरोंना विशेष

भारतात आढळली बनावट कोविशिल्ड लस; WHO च्या दाव्याने खळबळ.

नवी दिल्ली दि.18 अॉगस्ट – भारतात कोरोनाला रोखण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेत सध्या कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन (Covaxin) आणि रशियाच्या स्पुटनिक व्ही लशींचा वापर केला जात आहे. यात कोविशिल्ड लसीचा वापर भारतात अधिक प्रमाणात आहे. असे असताना जागतिक आरोग्य संघटनेला भारत आणि युगांडामध्ये बनावट कोविशिल्ड लस आढळून आली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.

(Fake Covishield vaccine found in India; Excitement over WHO’s claim.)

अॅस्ट्राझेनका-ऑक्सफर्डची लस सीरम इन्स्टिट्यूट तयार करत आहे. आता त्याच नावाने बनावट लशीच्या वायल्स वापरल्या जात असल्याचं समोर आलं असल्याचं वृत्त लाइव्ह मिंटने दिलं आहे. यामध्ये भारतात देण्यात येत असलेल्या कोविशिल्डबाबत शंका उपस्थित झाली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेनं कोविशिल्डबाबत अलर्ट जारी केला आहे. दक्षिण आणि पूर्व आशिया, आफ्रिका याठिकाणी जुलै, ऑगस्टमध्ये बनावट कोविशिल्ड (Covishield) सापडली होती. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्याला सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (Serum Institute of India) दुजोरा दिला असल्याचं WHO ने म्हटलं आहे.

भारताने रुग्णालये, क्लिनिक्स, हेल्थ केअर सेंटर, डिस्ट्रिब्युटर्स, फार्मसींवर लक्ष ठेवलं पाहिजे. देशात, विविध भागांमध्ये लसीचा पुरवठा करणाऱ्यांनी याबाबत दक्ष राहिलं पाहिजे. त्यांच्याकडून बनावट उत्पादन पुरवलं जाणार नाही याकडं लक्ष द्यायला हवं असंही आरोग्य संस्थेनं म्हटलं आहे. आढळून आलेले प्रोडक्ट हे खोटे असल्याचं सिद्ध झालं आहे. जाणीवपूर्वक, फसवणूक करण्याच्या उद्देशाने चुकीची माहिती दिली जात असल्याचं यामध्ये म्हटलं आहे.

भारतात 2 मिलीचे बनावट कोविशिल्ड आढळले. प्रत्यक्षात सीरम इन्स्टिट्यूट (Serum Institute) अशा प्रकारे 2 मिली (चार डोस) लस उत्पादन करत नाही. तर युगांडमध्ये एक्स्पायरी डेट संपलेली कोविशिल्डची लशीची वायल सापडली. सीरमनेसुद्धा याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेला दिली आहे.

बनावट कोरोना लस (Corona vaccine) जागतिक आरोग्यसाठी धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर अतिरिक्त ताण येण्याची शक्यता आहे. अशा प्रकारची बनावट उत्पादने ओळखणे आणि वेळीच बाहेर काढून रुग्णांना इजा होण्यापासून थांबवलं पाहिजे असं जागितक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. सीरम इन्स्टिट्यूटने याबाबत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. तर केंद्राने या प्रकरणाची चौकशी सुरु असल्याचं म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!