शेती विषयक

Kisan samman nidhi.. शेतकरी महासन्मान निधीसाठी 73 लाख शेतकरी पात्र ; 1 जुलै रोजी पहिला हप्ता.

55 / 100

मुंबई दि.26 जून – Kisan samman nidhi केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर महाराज शासनाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेचा पहिला हप्ता राज्यातील जवळपास 73 लाख शेतकऱ्यांना 1 जुलैला वितरीत होण्याची शक्यता आहे. Kisan samman nidhi.. 73 lakh farmers eligible for Farmer Mahasanman Fund; First installment on July 1.

आता केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी Kisan samman nidhi योजनेचे दोन हजार तर राज्याच्या योजनेतून दोन हजार, असे चार हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार आहेत. पण, राज्यातील 16 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यांनी अद्याप आधार प्रमाणीकरणासह इतर निकष पूर्ण केलेले नाहीत. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधीचा 14 वा हप्ता ज्या शेतकऱ्यांना मिळेल, त्यांनाच राज्याच्या योजनेचा पहिला हप्ता वितरित होणार आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राज्याच्या योजनेचा मोठा लोकार्पण सोहळा होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यासाठी पंतप्रधानांना निमंत्रण दिले असून 1 जुलैला हा कार्यक्रम होईल, अशी माहिती कृषी विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने दिली.

1 जुलै कृषी दिनी वितरित होणार पहिला हप्ता
महाराष्ट्र कृषी दिनाचे औचित्य साधून राज्यातील 73 लाख शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता (प्रत्येकी दोन हजार रुपये) वितरीत करण्याचे नियोजन आहे. पण, अजूनही आधार प्रमाणीकरण, ई-केवायसी, मालमत्ता नोंदी न केलेले 16 लाख शेतकरी आहेत. त्यांना या योजनेच्या लाभापासून वंचित रहावे लागणार अशी सद्य:स्थिती आहे. यामुळे आधार प्रमाणीकरण, ई-केवायसी व मालमत्तांची एकत्रित ऑनलाइन नोंद शेतकऱ्यांनी तात्काळ पूर्ण करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!