क्राईम डायरी… सासरच्या जाचास कंटाळून विवाहितेची आत्महत्या; केज तालुक्यातील घटना.

केज दि.18 अॉगस्ट – सतत होणाऱ्या सासरच्या शारीरिक व मानसिक जाचास कंटाळून विवाहेतेने (Married woman) राहत्या घरात साडीने गळफास घेऊन आत्महत्या (suicide) केल्याची घटना केज तालुक्यात घडली आहे. या प्रकरणी मयत विवाहितेच्या भावाच्या फिर्यादी वरून नवरा, सासरा व दिराच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा केज पोलिस (Police) ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

(Crime Diary… Married woman commits suicide after being harassed by her father-in-law; Incidents in Kaij taluka.)

या बाबतची अधिक माहिती अशी की, केज (Kaij) तालुक्यातील पिसेगाव येथील सायसराव लांडगे यांची मुलगी कल्पना हिचे लग्न सन 2014 मध्ये नाव्होली तालुका केज येथील दत्तात्रय उर्फ भुजंग झाडे याच्या सोबत झाले होते. तिला साडेतीन वर्षे वयाचा वैष्णव हा मुलगा व तीन महिन्याची लहान मुलगी अशी दोन अपत्ये आहेत. कल्पना हिला तिच्या सासरचे लोक शेतात बोअर घेण्यासाठी व मोटारसायकल घेण्यासाठी माहेरहून पैसे घेऊन येण्यास सतत मागणी करीत असत. त्यातून तिला शारीरिक व मानसिक छळ (harassed) देऊन मारहाणीचे देखील प्रकार घडलेले होते.

या सर्व त्रासाला कंटाळून कल्पना हिने दिनांक 18 मंगळवारी पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास घरातील लोखंडी आडूला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या बाबत दि.18 ऑगस्ट रोजी मयत कल्पना हिचा भाऊ अंकुश सायसराव लांडगे यांच्या तक्रारी वरून केज पोलिस ठाण्यात तिचा नवरा दत्तात्रेय उर्फ भुजंग माणिक झाडे, सासरा माणिक विठ्ठल झाडे व दिर गोरख उर्फ पोपट माणिक झाडे या तिघांच्या विरुद्ध गु.र.नं. 396/2021 भा.दं.वि. 306,498(अ), 323 व 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास जेष्ठ पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!