दुर्दैवी… नाल्याच्या पुरात दोन महिला वाहून गेल्या; 1 कि.मी. अंतरावर आढळले दोघींचे मृतदेह.

किनवट दि. 25 ऑगस्ट – नांदेड (Nanded) जिल्ह्याच्या किनवट तालुक्यातील शिवणी याठिकाणी शेतात दिवसभर काम करून घरी परतत असताना, दोन वयोवृद्ध महिलांवर काळानं घाला घातला. नाल्याच्या पुरात (Flood) वाहून गेल्याने दोघींचा मृत्यू झाला असून जवळजवळ एक किमी लांब त्यांचे मृतदेह आढळून आले.

(Unfortunately … two women were swept away in the flood of Nala; 1 km The bodies of both were found at a distance.)

शेतातून घरी परत जात असताना गावाजवळून वाहणाऱ्या नाल्याला पूर आल्यानं यात दोन महिला वाहून गेल्या (flow in Flood Water) आहेत. या दोघींचा मृतदेह घटनास्थळावरून 1 किमी अंतरावर आढळून आले आहेत. दुर्दैवी घटनेत एकाच वेळी दोन महिला वाहून गेल्यानं शिवणी गावात शोककळा पसरली आहे. प्रेमलाबाई लच्छन्ना तमलवाड (वय -60) आणि महमदाबी रज्जाक (वय- 61) अशी महिलांची नावं आहेत.

संबंधित दोन महिला आपल्या अन्य काही महिला मंडळींसोबत मंगळवारी शेतात निंदणी करण्यासाठी शिवणी शिवारात गेल्या होत्या. दुपारपर्यंत त्यांनी नेहमीप्रमाणे काम केलं. त्यानंतर दुपारचं जेवण उरकून त्या पुन्हा कामाला लागल्या होत्या. पण साडेतीनच्या सुमारास शिवणी परिसरात अचानक जोरदार पावसाला (heavy rain) सुरुवात झाली.

त्यामुळे या सर्व महिला शेतातच एका आडोशाला थांबल्या. पण बराच वेळ होऊनही पाऊस थांबत नव्हता. त्यामुळे त्यांनी कोसळणाऱ्या पावसात घरी जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पाच महिला शेतातून शिवणी गावच्या दिशेनं निघाल्या. पण शिवणी परिसरातील डोंगरावर झालेल्या जोरदार पावसामुळे शिवणी गावानजीक असणाऱ्या नाल्याला पूर आला होता. या नाल्यात वेगानं पाणी वाहत होतं. अशात स्थितीत संबंधित पाच महिलांनी वाहत्या पाण्यातून नाला पार करण्याचं ठरवलं. यासाठी या पाचही महिलांनी एकमेकींच्या हाताला पकडून त्यांनी ओढा पार करण्याचा प्रयत्न केला.

या पाच महिलांपैकी तीन महिला दुसऱ्या बाजूला ही गेल्या. पण दोन महिला अद्याप वाहत्या प्रवाहातच होत्या. तेवढ्यात त्यांचा हात सुटला. अन्य महिलांना काही कळायच्या आत संबंधित दोन महिला पाण्याच्या वेगवान प्रवाहासोबत वाहून गेल्या. घटनास्थळापासून जवळपास 1 किमी अंतरावर या दोन्ही महिलांचे मृतदेह (Dead body) आढळले आहे. या दुर्दैवी घटनेनंतर शिवणी गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!