तिघींशी संसार करणारा बापच निघाला वैरी; 13 वर्षाच्या मुलाच्या खूनाने बीड जिल्ह्यात खळबळ.

बीड दि.15 – आज बुधवारी (दि.15) सकाळी बीड (Beed) तालुक्यातील खडकी घाट येथील खोखडोह वस्तीवरील शेतातील एका पत्र्याच्या शेडमध्ये 13 वर्षीय मुलाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. याप्रकरणाचा पोलिसांनी (Police) अवघ्या काही तासात छडा लावून मुलाचा खून (Murder) बापानेच केल्याचे समोर आणले आहे.
(The father who lived with the three of them left as an enemy; Sensation in Beed district over murder of 13-year-old boy.)
बीड तालुक्यातील खडकी घाट येथील खोखडोह वस्तीवरील शेतातील एका पत्र्याच्या शेडमध्ये बुधवारी (दि.15) सकाळी 13 वर्षीय मुलाचा मृतदेह (Dead Body) आढळून आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून उलटसुलट चर्चेला उधान आले होते. पोलिसांनी तपासाची चक्रे गती फिरवत आपल्याच मुलाचा खून केलेल्या बापाला गजाआड (Arrested) केले.
उमेश वाघामारे असे त्या आरोपीचे नाव असून त्याने तीन विवाह केले आहेत. पहिली सोडून गेली, दुसरीने आत्महत्या (suicide) केली आणि तिसरी सोबत तो बीड मध्ये राहत होता. आपल्या पहिल्या पत्नी चा मुलगा आज्जी आजोबा सोबत खडकी घाट येथे राहत असताना जमिनीच्या वादा वरून खून केला असल्याचे माहिती समोर येत आहे.
राकेश उमेश वाघमारे (वय 13) या मुलाचा बुधवारी सकाळी एका पत्र्याच्या शेडमध्ये मृतदेह आला. राकेशचा खून आहे की घातपात याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते. पोलीसांनी या प्रकरणाचे गांभिर्य ओळखून तपास केला. यातच पोलिसांना त्या मुलाचा बाप पहाटेच गाव सोडून गेल्याची खबर मिळाल्यानंतर नेकनूर पोलीस अमोल नवले , श्री खांडेकर, श्री.घोलप, डोंगरे श्री.चव्हाण यांनी तात्काळ आरोपीचा माग काढला. तपासाची चक्रे गतीने फिरवत आरोपीला पाटोदा येथील पोलिसांच्या मदतीने पकडत बेड्या ठोकल्या. पुढील तपास नेकनुर पोलिस करत आहेत.