करुणा शर्मा यांच्या जामीनावर आज होणार निर्णय; माजी सैनिकाने केले उपोषण.

बीड दि.18 सप्टेंबर – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या कथित पत्नी करुणा शर्मा (Karuna Sharma) यांनी गाडीत पिस्तूल (Pistol) बाळगल्या प्रकरणी तसेच जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी (Judicial custody) सुनावण्यात आली होती. त्यांच्या जामीनावरील सुनावणी आज होणार असून जामीन मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

(Karuna Sharma’s bail to be decided today; The ex-soldier went on a hunger strike.)

दरम्यान करुणा शर्मा – मुंडे यांच्या समर्थनार्थ भारत ज्योती पुरस्कार प्राप्त माजी सैनिक प्रकाश वाघमारे यांनी बुधवारी (दि.15) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले. त्यांची सार्वजनिक व प्रशासनिक अत्याचारातून मुक्तता करावी, अशी मागणी त्यांनी निवेदनात केली आहे.

राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडें यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेण्यासाठी परळीला आलेल्या करुणा शर्मा – मुंडे यांच्या विरोधात दि.5 सप्टेंबर रोजी प्राणघातक हल्ला व अॅट्रॉसिटी (Atrocity) कायद्यान्वये गुन्हा नोंद झाला. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली असून सध्या त्या बीडच्या जिल्हा कारागृहात (District jail) आहेत. करुणा शर्मांनी तपास कार्यात संपुर्ण सहकार्यास तयार असून मला जामीन (bail) द्यावा, अशी याचिका कोर्टात दाखल केली होती.

करुणा शर्मा यांनी दाखल केलेल्या या याचिकेची मंगळवारी 14 सप्टेंबर रोजी सुनावणी होती. त्यामुळे करुणा शर्मा यांना जामीन मिळेल का नाही?, याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. परंतु तपास अधिकारी आणि सरकारी वकिलांकडून लेखी बाजू न मांडल्याने ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली. दरम्यान, करुणा शर्मा यांची पुढील सुनावणी आज दि.18 सप्टेंबर रोजी होणार आहे.

दरम्यान, त्यांच्या समर्थनार्थ प्रकाश वाघमारे यांनी निवेदन दिले आहे. करुणा शर्मा – मुंडे एक वर्षापासून आपल्या हक्क – अधिकारासाठी लढत असताना त्यांनाच खोट्या केसमध्ये गोवले जात आहे असा आरोप करून शासनाने ताकीदवजा पत्र काढावे अशी मागणीही करण्यात आली. देशसेवा व समाजसेवेचे वृत्त अंगीकारून पत्र लिहीत असल्याचेही श्री. वाघमारे यांनी आपल्या निवेदनात उल्लेख केला आहे.

शर्मा यांना अनेक विसंगत प्रकरणांत नीतिमूल्य बाजूला ठेवून गुन्हेगारी प्रकरणांत अडकविले जात आहे. खोट्या केस करणाऱ्यांवर आणि संविधान संहिता घटनेने दिलेल्या अधिकारांचे उल्लंघन करून प्रशासनातील काही जबाबदार अधिकारी व कर्मचारी व्यभिचार करत असतील तर त्यांच्यावरही कारवाईची मागणी प्रकाश वाघमारे यांनी केली आहे. त्यांनी दि.15 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणही (hunger strike) केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!