मोठी बातमी… पहाटे भुकंपाचा हादरा…. आत्तापर्यंत पंधरा ते वीस जणांचा मृत्यू.

इस्लामाबाद 07 ऑक्टोबर – आज (दि.7) पहाटे पाकिस्तान भूकंपाच्या (Earthquake in Pakistan) धक्क्यांनी हादरलं. पाकिस्तानच्या दक्षिणेकडील हरनाई भागात भूकंपाचे धक्के जाणवले, या भुकंपात आतापर्यंत किमान 15 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
(Big news … early morning tremors …. Fifteen to twenty people have died so far.)
नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीच्या (National Center for Seismology) म्हणण्यानुसार, आज पहाटे साडेतीनच्या सुमारास 6.0 रिश्टर स्केल (Richter scale) तीव्रतेचा भूकंप (Earthquake) पाकिस्तानाच्या हरनाई येथे झाला. पहाटेच्या साखर झोपेत असताना हा भुकंप झाला असून सध्या मृतांची संख्या तपासली जात आहे.
एएफपी (AFP) या वृत्तसंस्थेनुसार, पाकिस्तानच्या आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी गुरुवारी पहाटे दक्षिण पाकिस्तानात आलेल्या भूकंपामध्ये किमान 15 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. बलुचिस्तानच्या (Balochistan) प्रांतीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (Disaster Management Authority) प्रमुखाने एएफपीला सांगितलं, की आतापर्यंत 15 ते 20 लोकांचा बळी गेला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.