शेती विषयक

बीड, जालना, औरंगाबादसह पाच जिल्ह्यात पावसाचा इशारा; मॉन्सूनचा परतीचा प्रवास.

पुणे दि.8 अॉक्टोंबर –  नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा (Monsoon) परतीचा प्रवास सुरू झाला आहे. यातच कोकण, मध्य महाराष्ट्रात विजा, मेघगर्जनेसह जोरदार पाऊस (heavy rains) पडला आहे. आज (दि.8) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजा, मेघगर्जनेसह पावसाची (rain) शक्यता असून, तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने (Meteorological Department) दिला आहे.

(Rain warning for five districts including Beed, Jalna, Aurangabad; The return journey of the monsoon.)

पश्‍चिम बंगाल आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. तर तमिळनाडूच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती अरबी समुद्राकडे (Arabian Sea) सरकली असून, कर्नाटकच्या किनाऱ्यालगत आहे. त्यापासून रायलसीमा, आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट Yellow alert)
कोकण : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.
मध्य महाराष्ट्र : नाशिक, पुणे.
मराठवाडा : औरंगाबाद, जालना, बीड (Beed).

विजा, मेघगर्जनेसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट)
कोकण : मुंबई, ठाणे, पालघर.
मध्य महाराष्ट्र : धुळे, नंदूरबार, जळगाव, नगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर.
मराठवाडा : परभणी, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद, लातूर.

संभाव्य कमी दाब क्षेत्रामुळे पाऊस वाढण्याची शक्यता
बंगालच्या उपसागरात अंदमान समुद्राजवळ रविवार पर्यंत (दि.10) हवेचे कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढून ही प्रणाली शुक्रवारपर्यंत (दि.15) ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याकडे येण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहे. या प्रणालीमुळे विदर्भ, मराठवाड्यासह (Marathwada) राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!