दिलासादायक…. बीड कोरोना अपडेट; पहा काय आहे आजची स्थिती.

बीड दि.13 अॉक्टोबर – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 1683 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 16 जणांचा कोविड-19 (Covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (Positive) आला आहे. तर 1667 जण निगेटिव्ह आली आहेत. आज तपासणी जास्त असताना बाधितांची संख्या कमी आल्यामुळे समाधानकारक परिस्थिती आहे.
(Today’s Corona Update in Beed District; See what the status is.)
आजची तालुका निहाय आकडेवारी….
बीड-3, अंबाजोगाई-1, आष्टी-2, धारुर-0, गेवराई-2, केज-1, माजलगाव-3, परळी-1, पाटोदा-3, शिरुर-0, वडवणी-0 अशी आहे.
बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्येत बऱ्यापैकी कमी झाली आहे. जिल्ह्यात कोरोना मृत्यू दर मात्र चिंताजनक आहे. आज बुधवारी जिल्ह्यात दुसऱ्या लाटेतील सर्वात कमी बाधितांची संख्या आहे. जिल्ह्यातील एकुण मृत्यूची संख्या आता 2785 झाली आहे. जिल्ह्याचा मृत्यू दर राज्यात सर्वाधिक 2.70 इतका आहे. तर जिल्ह्यात सध्या एकुण 210 ॲक्टीव रुग्ण आहेत.
दरम्यान, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या काही आठवड्यांपासून मोठ्या प्रमाणात कमी होत असल्याचे दिसून येत आहे. राज्यात 2 हजार 069 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तर 43 कोरोना बाधित Corona Positive) रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
दिवसभरात 3616 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.36 टक्के आहे. राज्यात सध्या 30 हजार 525 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 2,31,009 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 1331 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.