मुलीच्या नावाने बनवले इन्स्टाग्रामचे फेक अकाऊंट; गेवराईत अल्पवयीन मुला विरुध्द गुन्हा.

बीड दि.24 अॉक्टोंबर – अलिकडच्या काळात मोबाईलवर सोशल मिडियाचा (Social Media) मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यात अल्पवयीन वयोगटातील मुला मुलींची संख्या मोठी आहे. मात्र याचा गैरवापर होत असल्याची अनेक तक्रारी समोर येत आहेत. असाच एक प्रकार बीड (Beed) जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात उघडकीस आला असून एका अल्पवयीन मुला विरुध्द गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

(A fake Instagram account created in the girl’s name; Crime against a minor in Gevrai.)

याबाबत मिळालेल्या माहितीनूसार, इन्स्टाग्राम (Instagram) या सोशल साईटवर बनावट अकाऊंट (fake account) तयार करून एका अल्पवयीन मुलीची फसवणुक केल्या प्रकरणी एका अल्पवयीन मुलावर गेवराई पोलिसांत (Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा प्रकार हा तालुक्यातील धोंडराई गावांत घडला आहे .

गावातील एका अल्पवयीन मुलगी तिच्या मैत्रिणीच्या नावाने एका लहान मुलाने बनावट अंकाऊंन्ट ईस्टाग्रावर तयार केले. तिला फ्रेंड रिक्वेस्ट (friend request) पाठवली आणि तीच्या सोबत चॅटिंग केले. तसेच तिच्या मैत्रणीचे फोटो पाठवून तिची फसवणुक केल्याबद्दल माहिती तंत्रज्ञान (Information Technology Act) 2008 चे कलम 66 ई 67 बी 419 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरिक्षक (Police Inspector) रविंद्र पेरगूलवार करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!