अंबाजोगाई अल्पवयीन अत्याचार प्रकरणी मोठी कारवाई; पोलिस, होमगार्ड व सेवानिवृत्त नायब तहसीलदार ताब्यात.

अंबाजोगाई दि.9 डिसेंबर – एका अल्पवयीन मुलीवर 400 जणांनी अत्याचार (Gang Rape) केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणामध्ये मोठी कारवाई होवून गेल्या 24 तासात एका पोलिस कर्मचार्यासह होमगार्ड, सेवानिवृत्त नायब तहसीलदारासह आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
(Major action in Ambajogai juvenile abuse case; Police, Home Guard and Retired Deputy Tehsildar in custody.)
अंबाजोगाई (Ambajogai) शहरात पाण्याच्या टाकीजवळ राहणार्या अल्पवयीन मुलीच्या (Minor girl) शरीराचे जवळजवळ 400 जणांनी लचके तोडल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. या प्रकरणात 8 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल झाल्यानंतर एक एक धक्कादायक बाबी पुढे येवू लागल्या. ज्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला ती निराधार अवस्थेमध्ये एकटीच असल्याचा गैरफायदा अनेकांनी उचलला. यात कधी पैशाची आमिष तर कधी जबरदस्ती तर कधी वेगवेगळ्या आमिषाचा बळी ठरलेल्या या अल्पवयीन पिडीतेवर शेकड्यावर लोकांनी अत्याचार केला.
गुन्हा दाखल झाल्यानंतर दहा ते बारा जणांना पोलिसांनी ताब्यातही घेतलेले आहे. अत्याचार करणार्यांमध्ये पोलिस (Police) कर्मचार्याचा समावेश असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आल्यानंतर न्यायालयाने पोलिसांवरच ताशेरे ओढत आरोपीला अटक का होत नाही असा प्रश्न उपस्थितीत केला होता.
न्यायालयाच्या याच भूमिकेमुळे पोलिसांनी गेल्या 24 तासामध्ये आठ जणांना अटक केली असून यामध्ये एक पोलिस कर्मचारी, एक होमगार्ड, लॉज चालक असलेले एक सेवानिवृत्त नायब तहसीलदार व इतर एक लॉज चालक, एक लॉजचा मॅनेजर अशा आठ जणांचा समावेश आहे. या प्रकरणाचा तपास अप्पर पोलीस अधिक्षक (Upper Superintendent of Police) कविता नेरकर पवार या करीत आहेत.
जवळपास सहा महिने एकटी आणि कसलाही आधार नसताना राहत असलेल्या अल्पवयीन मुलीच्या शरिराचे लचके शेकड्यावर लोकांनी तोडले. प्रकरण पोलिसात गेल्यानंतर ज्यांना आपणही अटकू अशी भिती वाटत आहे असे अनेकजण अंबाजोगाई शहर सोडून फरार झाले असल्याची चर्चा अंबाजोगाई शहरामध्ये सुरू झाली आहे.