अखेर नवीन नियमावली जाहीर… रात्रीच्या संचारबंदीसह हे आहेत नवीन नियम…

मुंबई दि.24 डिसेंबर – राज्यातल्या कोविड (Covid-19) रुग्ण संख्येत होणारी वाढ लक्षात घेता संसर्ग रोखण्यासाठी कशाप्रकारे निर्बंध लावता येतील यावर आज टास्क फोर्स (Task Force) सदस्यांची बैठक झाली होती. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मार्गदर्शन केले. आज सभागृहात याबाबतची अधिकृत घोषणा मंत्री अनिल परब यांनी केली.

(Finally new rules announced … These are the new rules with night curfew …)

आगामी नाताळ, नववर्ष (New Year) स्वागत असे प्रसंग लक्षात घेऊन कमीतकमी गर्दी कशी होईल तसेच विवाह समारंभ, पार्ट्या या अनुषंगाने हॉटेल्स आणि उपहारगृहात होणाऱ्या गर्दीवर कसे निर्बंध (restrictions) लावता येतील यादृष्टीने विस्तृत चर्चा करण्यात येऊन याबाबतची अधिकृत घोषणा आज (दि.24) मंत्री अनिल परब यांनी सभागृहात केली.

ओमिक्रॉनची (Omicron) परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी त्यांच्या त्यांच्या पातळीवर बैठका घेतल्या. या आढावा बैठकांमधून येणाऱ्या 15 दिवसांचा आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती मिळते. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात ओमिक्रॉनचा पीक पिरेड असण्याची शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे. त्या अनुषंगाने पावलं उचलण्यात येत आहेत.

अशी आहे नवीन नियमावली …
-राज्यभरात रात्रीची 9 ते सकाळी 6 जमावबंदी लागू
-5 पेक्षा जास्त लोक एकत्र येऊ शकणार नाहीत
आज रात्री 9 पासून राज्यात नवी नियमावली लागू
-31 जिसेंबरच्या पार्श्वभूमीवर चौपाट्यांवर रात्रीची जमावबंदी
-फटाके फोडता येणार नाहीत, आतषबाजी नाही
-लग्नसमारंभ, कार्यक्रम यांवरही निर्बंध
100 जणांनाच परवानगी, आधी ही मर्यादा 200 होती.

-बंदिस्त जागेतील कार्यक्रम
समारंभ , लग्न, इतर कार्यक्रम यांसाठी 100 लोकांनाच परवानगी
-25% किंवा 100 यामध्ये जी कमी ती मर्यादा लागू
-ओपन 50% किंवा 100 यामध्ये जी कमी ती मर्यादा लागू 100 लोकांनाच परवानगी
-रेस्टरंट- 50% क्षमतेनच सुरु राहणार
प्रशासनाचं आता हॉटेल, रेस्टॉरंटकडे बारकाईनं लक्ष असेल.

मुंबईची स्थिती काय?
3 महिन्यांनंतर मुंबईत अचानक स्पाईक
ऑक्टोबरमध्ये मुंबईतील दरदिवशी वाढणारी रुग्णसंख्या 550 -600 होती…
3 महिन्यांनंतर रुग्ण संख्या वाढ बघायला मिळतेय
मुंबईत दरदिवसाला 45 हजार टेस्टींग होत आहेत
काल बैठकीत टास्क फोर्सचा भर कशावर होता?
जलद लसीकरण (vaccination) मोहीम
बुस्टर डोस बाबत केंद्राकडे पाठपुरावा करणे, किमान हेल्थ/फ्रंटलाईन वर्कर्सला बुस्टर डोस मिळावा
केंद्राकडे लहानमुलांच्या लसिकरणासाठी पाठपुरावा करावा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!