बीड जिल्ह्यात ईडीची मोठी कारवाई; आणखी एक नेता आला अडचणीत….

बीड दि.11 जानेवारी – गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांची बीड जिल्ह्यातील पोल्ट्री (Poultry) ईडीनं जप्त केली आहे. यामुळे आमदार (MLA) रत्नाकर गुट्टे यांची आणखी एक मालमत्ता ईडीच्या ताब्यात गेली आहे. रत्नाकर गुट्टे यांच्यावर शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल आहे.
(Major action of ED in Beed district; Poultry industry confiscated.)
आ. रत्नाकर गुट्टे (Ratnakar Gutte) यांनी सुमारे 635 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचं म्हटलं जातं आहे. ईडीनं (ED) यापूर्वी सुमारे 255 कोटी रुपयांची मालमत्ता आधीच जप्त केलेली आहे. आता पुन्हा ईडीने जप्तीची कारवाई सुरू केली आहे.
शेतकऱ्यांच्या फसवणूक प्रकरणी गेल्या आठवड्यात गंगाखेड शुगर (Gangakhed Sugar) एन्ड एजन्सी मिल ची सुमारे 100 एकर जमीन जप्त ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. त्यानंतर आता बीडमधील परळी-अंबेजोगाई रोडवरील (Parli Ambajogai Highway) वरवई गावातील ही पोल्ट्री जप्त करण्यात आली आहे.
आमदार रत्नाकर गुट्टे यांना पुन्हा एकदा ईडीने चौकशी साठी बोलावलं होतं. मात्र ,त्यांची तब्येत बिघडल्याने ते उपस्थित राहिले नाहीत. 255 कोटी रुपयांची मालमत्ता अगोदरच जप्त रत्नाकर गुट्टे हे रासपचे गंगाखेड विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत.
त्यांच्यावर शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल आहे. त्यांनी सुमारे 635 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचं म्हटलं जातं आहे. त्यापैकी सुमारे 255 कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने आधीच जप्त केली आहे. त्यानंतर आता पुन्हा ईडीने जप्तीची कारवाई सुरू केली आहे.
मालमत्ता जप्त करण्याची ईडीची एक प्रक्रिया असते. आधी ईडी तपास करते. हा तपास दोन पातळ्यांवर असतो. एक म्हणजे मनी लाँडरिंगची (Money laundering) रक्कम शोधणे आणि दुसरं म्हणजे त्या रकमेची मालमत्ता जप्त करणे. या ईडीने प्रक्रियेनुसार मालमत्ता जप्त केली. त्यानंतर त्याची माहिती कोर्टाला दिली.
PMLA कायद्यानुसार एखाद्या आरोपीची मालमत्ता जप्त केल्या नंतर त्याची माहिती कोर्टाला द्यावी लागते. त्यानंतर कोर्ट त्यावर शिक्कामोर्तब करत. त्यानंतर ईडी मालमत्ता आपल्या ताब्यात घेत असते. आमदार गुट्टे यांच्या मालमत्ते बाबत ही प्रक्रिया झाल्यानंतर आता त्याची मालमत्ता ईडीच्या ताब्यात आल्या आहेत.