दहावीच्या निकालासंदर्भात मोठा निर्णय; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा.

मुंबई दि.17 जून – कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता राज्य सरकारने इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द केल्या. यातच दहावीच्या निकालासंदर्भात काल दि.16 रोजी राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी मोठा बदल केला आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये आता चित्रकला परीक्षांचेही गुण समाविष्ट होणार आहेत.
(A big decision regarding the outcome of the tenth; Announcement by Education Minister Varsha Gaikwad.)
शैक्षणिक वर्षे 2020-2021 या वर्षात जे दहावीचे विद्यार्थी यापूर्वी शासकीय रेखा कला परीक्षेत (Elementary and Intermediate Drawing Grade) उर्त्तीण झालेत. अशा विद्यार्थ्यांना शिक्षण मंडळाच्या प्रचलित धोरणांनुसार अतिरिक्त गुण मिळणार आहे. असे राज्य शासनाच्या शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे आता दहावी इयत्तेत असणाऱ्या आणि एलिमेंटरी पास झालेल्या परंतु इंटरमिजीएट ड्रॉईंग ग्रेड चित्रकला परीक्षांमध्ये बसता न आलेल्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण मिळणार आहेत.
परंतु ही सवलत फक्त अशाच दहावीच्या विद्यार्थ्यांना लागू होणार आहे, जे एलिमेंटरी ड्रॉईंग ग्रेड परीक्षा उत्तीर्ण झालेत परंतु कोरोनामुळे इंटरमिजीएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षेस बसता आले नाही. या विद्यार्थ्यांना एलिमेंटरी ड्रॉईंग ग्रेड परीक्षेस मिळालेल्या श्रेणीच्या आधारे सन 2020-21 मध्ये इ. १० वी परीक्षेत अतिरिक्त गुणांची सवलत दिली जाणार आहे. यासंदर्भातील आदेश नुकताच शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी आपल्या ट्वीटर अकाउंटवरुन शेअर केला आहे.
या नव्या आदेशाप्रमाणे काय म्हटले आहे?
शालेय शिक्षणमंत्री (Education Minister) वर्षा गायकवाड यांनी जाहीर केलेल्या आदेशात म्हटले आहे की, राज्यातील कोव्हीड-19 (Covid-19) या संसर्गजन्य साथ रोगाच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शासकीय रेखाकला (Elementary and Intermediate Drawing Grade) परीक्षा 2021 चे आयोजन करण्यात येऊ नये, असा प्रस्ताव कला संचालनालयाच्या वर नमूद क्रमांक (4) येथील पत्रान्वये शासनास सादर करण्यात आला होता.
त्यानुसार राज्यातील कोव्हीड-19 (Covid-19) या संसर्गजन्य साथ रोगाच्या प्रादूर्भावामुळे, तसेच, विद्यार्थ्यांचे आरोग्य व सुरक्षिततेची बाब विचारात घेऊन शासकीय रेखाकला परीक्षा 2020 चे आयोजन न करण्याबाबतचा शासन निर्णय वर नमूद क्रमांक 6 नुसार दिनांक 26 मार्च, 2021 रोजी निर्गमित करण्यात आला आहे.
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वर नमूद दिनांक 12 मे, 2021 च्या शासन निर्णयान्वये सन 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षा रद्द करण्यात आली आहे. तसेच, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वर नमूद दिनांक 28 मे, 2021 च्या शासन निर्णयान्वये शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इ. 10 वी) साठी मूल्यमापन करताना शासनाच्या व मंडळाच्या धोरणानुसार व तरतुदीनुसार देत असलेल्या अन्य गुणांचा लाभ प्रचलित पद्धतीनुसार देण्यास मान्यता देण्यात आली आहे.
कोरोनामुळे इंटरमिजिएट ड्राईंक ग्रेड परीक्षा आयोजित करणं शक्य नसल्यानं 2020-21 यै शैक्षणिक वर्षासाठी एलिमेंटरी ड्रॉईंग ग्रेड परीक्षेस मिळालेल्या श्रेणीच्या आधारे सन 2020-21 मध्ये इ.10 वी परीक्षेत अतिरिक्त गुणांची सवलत देण्यात येईल.