जिल्ह्यात अपघाताची शृंखला सुरु; पिक अप व ट्रॅक्टरची समोरासमोर धडक.

बीड दि.24 मे – आज मंगळवारी (दि.24) पिक अप व ट्रॅक्टरची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. यात सहा जण जखमी झाले असून जखमींना बीड येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर अपघात मांजरसुंबा-पाटोदा दरम्यान लिंबागणेश जवळ झाला.
बीड जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून अपघाताची मालिका सुरू आहे. केज व धारुर येथे दोन दिवसांत तीन अपघात घडले आहेत. या तिन्ही अपघातात तिघांनी आपले प्राण गमावले आहेत. आज चौथ्या दिवसाची सुरुवातही अपघाताने झाली आहे. सकाळी मांजरसुंबा-पाटोदा महामार्गावर लिंबागणेश येथील महावितरण कार्यालयासमोर भीषण अपघाताची घटना घडली.
पिक अप क्रमांक एम.एच. 24 एबी 6460 व ट्रॅक्टरची समोरासमोर धडक झाली. या अपघातात महादेव जाधव रा. लिंबागणेश यांच्यासह पिक अप मधील बबन सोपान सुर्यवंशी ( वय 50 वर्ष ),कुंडलिक गंगाराम सुर्यवंशी ( वय 60 वर्ष ) ,कांशीराम सुर्यवंशी ( वय 50 वर्ष ),चंद्रकांत विश्वंभर माने ( वय 38 वर्ष ) अनुसया अच्युत सुर्यवंशी, मंडुबाई केरबा गायकवाड (वय 60 वर्ष ),सिंधुबाई धमाजी माने ( वय 45 वर्षं ) सर्व रा. उदगीर ( जि. लातूर ) हे जखमीं झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच महामार्ग व नेकनूर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालय, बीड येथे पाठविण्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्ग 548 डी या रस्त्यावरील लिंबागणेश येथे हा अपघात झाला आहे. जिल्ह्यात सलग चार दिवसांपासून अपघाताची शृंखला सुरु आहे.
( A series of accidents started in the district; Pick up and hit the tractor face to face. )