कोरोंना विशेष

आजपासून या जिल्ह्यात संपूर्ण संचारबंदी लागू; सोमवारी रात्री जिल्हाधिकाऱ्यांनी केली घोषणा

परभणी दि.23 मार्च- महिनाभरापासून परभणी जिल्ह्यात कोरोना विषाणूचा (Corona virus) संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मागच्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येचा उद्रेक होत असून दररोज २०० पेक्षाही अधिक रुग्ण नोंदवले जात आहेत. यामुळे आता प्रशासनाने कठोर पावले उचलली असून, संपूर्ण जिल्ह्यात संचारबंदी (curfew) लागू करण्याचा निर्णय सोमवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास घेतला आहे.

(A total curfew will be imposed in the district from today; The announcement was made by the district collector on Monday night)

परभणी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची (Corona Positive) संख्या दिवसेंदिवस वाढत असून, कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी संचारबंदीचा पर्याय निवडण्यात आला आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार २४ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजेपासून ते ३१ मार्च रोजी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत जिल्हाभरात संचारबंदी (curfew) लागू केल्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर (Collecter Dipak Muglikar) यांनी काढले आहेत.

दरम्यान, सोमवारी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील कोरोना विषाणूचा (Corona virus) वाढता संसर्ग रोखण्यासाठी दोन दिवसात कठोर निर्णय घेण्याचा इशारा दिला. राज्य शासनाच्या निर्णयापुर्वीच परभणी जिल्ह्यात बुधवारपासून सर्व बाजारपेठ तसेच इतर आस्थापना बंद ठेवण्यात येणार आहेत. संचारबंदीच्या काळात नागरिकांनी घराबाहेर पडू नये, गर्दी टाळावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

परभणी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची (Corona Positive) वाढणारी संख्या पाहता आता जिल्ह्यात अनेक निर्बंध वाढवण्यात येत आहेत. बाहेर जिल्ह्यांतून परभणीत अप-डाऊन करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही जिल्ह्यात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नोकरीच्या निमित्ताने अप-डाऊन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निर्बंध घातले आहेत. बाहेर जिल्ह्यात जाण्यास तसेच बाहेर जिल्ह्यातून परभणी जिल्ह्यात येण्यास अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही जिल्ह्यात प्रवेश करण्यास बंदी करण्यात आली आहे. यासोबतच मास्कचा वापर न करता सार्वजनिक ठिकाणी फिरताना आढळून येणाऱ्या व्यक्तीस ताब्यात घेऊन त्याला एक दिवसासाठी क्वाॅरंटाइन करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर (Collecter Dipak Muglikar) यांनी सोमवारी हे आदेश काढले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!