घात अपघात

Accident धारुरात अपघात सत्र ; दोन ठार.

60 / 100

किल्लेधारुर दि.31 मे – Accident  आयशर टेम्पो व रिक्षाची समोरासमोर धडक होवून झालेल्या अपघातामध्ये रिक्षा चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना धारूर घाटामध्ये शुक्रवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली . माऊली भास्कर घुले वय ३० वर्षे रा . गावंदरा असे मयत झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे .

धारूर येथील घाटात धोकादायक वळणामुळे अपघाताचे सत्र सतत सुरूच आहे .शुक्रवारी दुपारी धारूर कडून आयशर टेम्पो तेलगावकडे जात होता . यावेळी तेलगाव कडून येणाऱ्या रिक्षास घाटातील धोकादायक वळणाच्या ठिकाणी समोरा -समोर धडक झाली . या अपघातात रिक्षाचालक माऊली भास्कर घुले गंभीर जखमी झाला . त्यास स्वराती रुग्णालय अंबाजोगाई येथे नेत असताना त्याचा मृत्यू झाला . अपघातामध्ये आयशर टेम्पो व रिक्षाचा समोरील भाग चकाचूर झाला आहे . रस्त्यावर अपघात झाल्यानंतर दोन्ही वाहने बराशीमध्ये गेले . धारूर घाटात अपघाताचे प्रमाण वाढले असून गुरुवारी रात्रीही एका दुचाकी स्वारास टिप्परची धडक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली होती . अवघ्या २४ तासात घाटामध्ये अपघातामुळे दोघांचा बळी गेला आहे . माऊली घुले यांच्यावर शुक्रवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले .गावंदरा गावावर यामुळे शोककळा पसरली होती .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!