नित्रुडहुन मानवतला जाणाऱ्या व्यापाऱ्याचा अपघाती मृत्यू; पत्नी गंभीर जखमी.

माजलगाव दि.7 जुन – मानवत येथील कापड व्यापारी बजरंग कुठे यांच्या स्कुटीचा पाथरी माजलगाव रस्त्यावर अपघात (Accident) होऊन कुटे यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांची पत्नी सुशीला या गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमीस उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे. ही घटना 7 जून रोजी दुपारी 12 च्या सुमारास घडली आहे.
मानवत येथील कापड व्यापारी बजरंग कुटे (वय 45) आणि त्यांची पत्नी सुशीला कुटे हे स्कुटी वरून नित्रुड ता.माजलगाव येथून माजलगाव मार्गे मानवत कडे जात होते. त्यांच्या दुचाकीला पाथरी ढालेगाव रस्त्यावर आष्टी फाटा परिसरात अपघात झाला. या अपघातात बजरंग कुटे यांच्या डोक्याला मार लागल्याने ते जागीच ठार झाले तर त्यांच्या पत्नी सुशीला कुटे या गंभीर जखमी झाल्या.
घटनास्थळी 108 रुग्णवाहिकेतून (Ambulance) मधून जखमींना पाथरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुशीला कुटे गंभीर जखमी असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड (Nanded) येथे हलविण्यात आले आहे. त्यांच्या स्कुटीचा अपघात नेमका कसा झाला याची माहिती मात्र मिळू शकली नाही. बजरंग कुटे यांच्या मृत्यूमुळे मानवत बाजारपेठ व शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
( Accidental death of a trader from Nitrud to Manwat; Wife seriously injured. )