आमदार पतींची पतसंस्था चोरट्यांनी फोडली… दोन लाखांसह ५७ हजारांचे चिल्लर लंपास

अंबाजोगाई : दि.२१(प्रतिनिधी) केज मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार नमिता मुंदडा Namita Mundada यांचे पती अक्षय मुंदडा Akshay Mundada यांची शहरातील वर्दळीच्या रस्त्यावर असलेल्या अंबाजोगाई Ambajogai नागरी सहकारी पतसंस्था अज्ञात चोरट्यांनी फोडून दोन लाख रोख रक्कमेसह ५७ हजारांचे चिल्लर लंपास केल्याची घटना शनिवारी (दि.२१) सकाळी उघडकीस आली.
शहरातील सायगाव नाका परिसरात स्व.मीनाताई ठाकरे चौकात असलेल्या अंबाजोगाई Ambajogai नागरी सहकारी पतसंस्थेत चोरी झाल्याचे आज उघड झाले. शुक्रवारी दैनंदिन कामकाज आटोपल्यानंतर जमा झालेली २ लाख २ हजार ६६७ रुपयांची रक्कम कुलुपबंद कपाटात ठेऊन सर्व कर्मचारी कार्यालय बंद करून निघून गेले. शनिवारी पहाटे २.३० ते ३.१५ च्या दरम्यान कारमधून आलेल्या चोरट्यांनी पतसंस्थेचे शटर उचकून आत प्रवेश केला. त्यानंतर कपाटाचे कुलूप तोडून आत ठेवलेली ५७ हजारांच्या चिल्लरसह दोन लाख २ हजार ६६७ रुपयांची रक्कम घेऊन चोरटे पसार झाले. शनिवारी सकाळी ६.३० वाजता ही चोरी उघडकीस आली असे पतसंस्थेचे व्यवस्थापक रामलिंग गुरुलिंगअप्पा सोनटक्के यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे. पतसंस्थेचे अध्यक्ष अक्षय मुंदडा Akshay Mundada यांनी खबर दिल्यानंतर अंबाजोगाई शहर पोलिसांनी Police घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. पतसंस्थेसमोरील एका दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेरात चोरटे कैद झाले आहेत. पहाटे २.३० ते ३.१५ च्या दरम्यान कारमधून आलेल्या तीन चोरट्यांनी ही चोरी केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून दिसून येत आहे. सदर फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे. याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस Police उपनिरिक्षक कांबळे करत आहेत.