केज तालुक्यातील बहुचर्चित रेडीओ स्फोट प्रकरणातील आरोपीची मुक्तता; खटला रद्द.

अंबाजोगाई दि.19 जुलै – केज तालुक्यातील काळेगाव घाट येथे 30 नोव्हेंबर 2012 रोजी रेडिओचा भीषण स्फोट (explosion of radio) झाला होता. हा रेडिओ स्फोट घडवल्याच्या प्रकरणात आबा ऊर्फ मुंजाबा राजाभाऊ गिरी (रा. केंद्रेवाडी, ता. अंबाजोगाई) यास दोषी ठरवून अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयाने (District and Sessions Court) जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र, आरोपी विरोधात कुठलाही सबळ पुरावा नसल्याचे स्पष्ट करत उच्च न्यायालयाच्या (High court) औरंगाबाद खंडपीठाने हा खटला रद्दबातल ठरवत आबा उर्फ मुंजाबा गिरी याची निर्दोष मुक्तता केली.

(Acquittal of accused in Kaij taluka high profile radio blast case; Case canceled.)

केंद्रेवाडी ता.अंबाजोगाई येथील आबा ऊर्फ मुंजाबा राजाभाऊ गिरी यांचे गावातीलच गोपीनाथ तरकसे यांच्यासोबत शेतीवरून भांडण सुरू होते. त्यामुळे तरकसे यांचा काटा काढण्याच्या उद्देशाने आबा गिरीने नांदूरघाट येथील दत्ता जाधव यांच्याकडून जिलेटिन कांड्या (Gelatin sticks) घेऊन रेडिओ स्फोटचा कट रचला. मात्र, यात रेडिओचे पार्सल बसमध्येच राहिले अन् याचा मोह बसच्या वाहकाला आवरता आला नाही. तो रेडिओ घरी घेऊन गेला आणि स्फोटात त्याचे कुटुंब जखमी झाले.

यात त्यांचा दोन वर्षांचा मुलगा कुणाल घराबाहेर फेकला गेला व घराचे पत्रेही उडून गेले होते. परिसरात तीन कि.मी. परिसरात स्फोटाचा आवाज गेला होता. दुर्घटनेत वाहक निंबाळकर (32), पत्नी उषा (26), आई कुसुमबाई (60), मुलगा कुणाल गंभीर जखमी झाले होते. या स्फोटात ओम रमेश निंबाळकर यांचे दोन्ही हात निकामी झाले. त्यांच्या पत्नी उषा यांना पाय गमवावे लागले. तर चार वर्षांचा मुलगा कुणाल याला दोन्ही डोळे गमवावे लागले होते. यामुळे आई कुसुमबाई यांच्या नशिबी ऐन वृद्धापकाळात अपंगत्व आले.

वाहक ओम रमेश निंबाळकर यांस बसमध्ये बेवारस खोके आढळले होते. निंबाळकर यांनी आगारात जमा करण्याऐवजी ते घरी नेले होते. त्यात रेडिओ निघाला. रेडिओमध्ये सेल टाकताच दुपारी दीड वाजता जोरदार स्फोट झाला होता. केज तालुक्यातील काळेगाव घाट येथे 30 नोव्हेंबर 2012 रोजी रेडिओचा भीषण स्फोट झाला होता. ग्रामीण भागातील या स्फोटामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. बाँबशोधक पथक, एटीएसचे पथक काळेगावात दाखल झाले होते. या स्फोटाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले गेले होते.

पोलिसांनी (Police) या स्फोटाचा तपास पूर्ण करून आबा गिरी याच्याविरुद्ध न्यायालयात 11 जानेवारी 2014 रोजी दोषारोपपत्र सादर केले. अंबाजोगाई येथे अपर सत्र न्यायाधीश आर. ए. गायकवाड यांच्यासमोर प्रकरणाची सुनावणी झाली. सरकार पक्षातर्फे चोवीस साक्षीदार तपासण्यात आले. सबळ पुरावा ग्राह्य धरून न्यायालयाने आबा ऊर्फ मुंजाबा राजाभाऊ गिरी यास शिक्षा सुनावली. स्फोटासाठी लागणाऱ्या जिलेटिनच्या कांड्या (Gelatin sticks) पुरवल्याचा आरोप असणाऱ्या दत्ता साहेबराव जाधव यांच्या विरोधात सबळ पुरावा न मिळाल्याने निर्दोष मुक्तता करण्यात आली.

दरम्यान, आबा गिरी यानेच रेडीओचे पार्सल बसमध्ये ठेवल्याचा पूरावा नाही, तसेच रेडीओमध्ये सेल टाकल्याबरोबर स्फोट होईल असे सर्किट तयार करण्याएवढा आरोपी तज्ञ नाही असे उच्च न्यायालयाने (High court) म्हटले आहे. त्यामुळे संशयाचा फायदा देत न्यायालयाने हा खटला रद्दबातल करून आबा गिरी याची मुक्तता केली. या प्रकरणात आरोपीच्या वतीने ॲड. सिद्धेश्वर ठोंबरे यांनी काम पाहिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!