आठ उपोषणकर्त्यांची प्रकृती ढासळल्यानंतर कारवाई; मागणी पुर्ण केल्यानंतर ग्रामस्थांची माघार.

47 / 100

किल्लेधारूर दि.26 सप्टेंबर – धारुर तालुक्यातील आरणवाडी येथे दि.23 शुक्रवारी रस्त्यावरच ग्रामस्थांनी ठिय्या सुरु केला. गावातील माळीवस्ती रस्त्याचे काम सुरु असून सदर काम अरुंद होत असल्याने रस्ता किमान 30 फुटाचा करावा यासाठी ग्रामस्थ आक्रमक झाले होते. शुक्रवार पासून रस्त्यावरच ग्रामस्थ आमरण उपोषण करत असून दि.25 रविवारी उपोषणकर्त्यांची आरोग्य तपासणी केली असता आठ उपोषणकर्त्यांची प्रकृती बिघडल्याचा अहवाल आरोग्य पथकाने दिला. यानंतर प्रशासनाने याची दखल घेत घटनास्थळी धाव घेतली असून रस्त्याचे काम सुरु केले आहे. रात्री उशीरा उपोषणकर्त्यांनी मागणी पुर्ण झाल्यामुळे उपोषणातून माघार घेतली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, धारुर (Dharur) तालुक्यातील आरणवाडी येथील सर्वे नंबर 6 व 7 च्या नंबर बांधावरून माळीवस्तीकडे जाणारा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक (Chief Minister Gram Sadak Yojna) योजनेतून करण्यात येत आहे. मात्र प्रशासनाकडून केवळ आठ फुटाचा रस्ता काढून दिला जात असल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी आक्रमक पावित्रा घेत शुक्रवारी रस्त्यावर आमरण उपोषण (Immortal fasting) सुरु केले होते. सदर रस्ता अरूंद असल्याने या भागातील ग्रामस्थ व विद्यार्थ्यांची गैरसोय होते. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून हा रस्ता होत असल्याने नंबर बांधा वरून 30 फुट रस्ता काढण्याचे मागणी ग्रामस्थांनी केली. ग्रामस्थांच्या मागणीवरुन मंडळ अधिकारी , तलाठी व पोलीस प्रशासना सदर रस्त्याची पाहणी केली. परंतू पाहाणीनंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी 8 फुटाचा रस्ता खुला करून दिला.

वाहतूकीसाठी रस्ता किमान 30 फुट रुंदीचा आवश्यक असल्यामुळे सदर रस्ता 8 फुट ऐवजी 30 फुट रुंदीचा करुन ग्रामस्थ व विद्यार्थ्याची गैरसोय दुर करावी या मागणीसाठी ग्रामस्थांनी सदर रस्त्यावरच शुक्रवार पासून आमरण उपोषण सुरू केले होते. रस्ता खुला केल्या शिवाय हे आंदोलन मागे घेणार नसल्याचा निर्धार या वस्ती वरील रहिवाशांनी केला. या उपोषणात सरपंच लहू फुटाणे, मधुकर फुटाणे, प्रदीप फुटाणे, मैनाबाई फुटाणे, नवनाथ फुटाणे, सुरेश फुटाणे यांच्यासह 35 ते 40 ग्रामस्थ सहभागी झाले होते. रविवारी (दि.25) रोजी या उपोषणकर्त्यांची भोगलवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकाकडून आरोग्य तपासणी करण्यात आली.

आरोग्य पथकाने उपोषणकर्त्यांपैकी आठ जणांची प्रकृती अस्वस्थ असल्याची माहिती प्रशासनाला दिली. याची दखल घेवून नायब तहसीलदार रामेश्वर स्वामी यांनी तात्काळ उपोषणस्थळी धाव घेत सामाजिक कार्यकर्त्यांसह ग्रामस्थांशी चर्चा केली. यानंतर तात्काळ कारवाई करत रस्ता मोकळा करण्यास सुरुवात केली. परंतू उपोषणकर्त्यांनी पुर्ण रस्ता 30 फुट मोकळा केल्याशिवाय उपोषण सोडणार नसल्याच्या निर्णयावर ठाम राहण्याचा निर्णय घेतला होता. अखेर प्रशासनाने दाखवलेली तत्परता तसेच आमदार प्रकाश सोळंके व जि.प. माजी सभापती जयसिंग सोळंके यांच्या मध्यस्थीनंतर रात्री उशीरा ग्रामस्थांनी उपोषण सोडले. यावेळी भ्रष्टाचार निर्मुलनचे सादेक इनामदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष नितिन शिनगारे, मंडळ अधिकारी नजिर कुरेशी आदी उपस्थित होते.
( Action after health of eight hunger strikers deteriorated; After fulfilling the demand, the villagers retreated. )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!