अभिनेता रोहन पाटील आणि नितीश चव्हाण लोकांना करणार “मजनू”; मजनू चित्रपट लवकरच सर्वांच्या भेटीला.

मुंबई दि.8 मार्च – बहुचर्चित असलेला मजनू चित्रपट लवकरच सर्वांच्या भेटीला येतोय , अनेक दिवसांपासून लाखो लोक या चित्रपटाची वाट पाहत आहेत , मजनू चित्रपटातून लोकांना खरच काही तरी वेगळं पाहायला भेटणार आहे अस रोहन पाटील यांचं म्हणंन आहे.
( Actors Rohan Patil and Nitish Chavan will make people “Majnu”; Majnu movie will be available soon. )
या चित्रपटात मुख्य भूमिकेत रोहन पाटील, ‘लागीर झालं जी’ फेम नितीश चव्हाण , स्वेतलाना अहिरे , मिलिंद शिंदे , माधवी जुवेकर , सुरेश विश्वकर्मा , भक्ती चव्हाण , अदिती सारंगधर , प्रणव रावराणे , अरबाज शेख एवढे कलाकार दिसणार आहेत. मजनू चित्रपटा बाबत प्रेक्षकांच्या उत्साहावरून अस वाटते की हा चित्रपट नक्कीच अनेक रेकॉर्ड ब्रेक करेल.
‘मजनू’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला…
मराठी चित्रपट आणि प्रेमकथा यांचे एक वेगळे समीकरण आहे. काही दिवसांत एक हटके प्रेमकथा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून ‘ मजनू’ असे या चित्रपटाचे नाव आहे. शिवाजी दोलताडे दिग्दर्शित ‘मजनू’ या चित्रपटात ‘लागीर झालं जी’ फेम अभिनेता नितीश चव्हाण, अभिनेता (Actor) रोहन पाटील आणि अभिनेत्री स्वेतलाना अहिरे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.
‘मजनू’ बद्दल बोलताना दिग्दर्शक शिवाजी दोलताडे म्हणाले की, ‘मजनू’ हे एक ग्रामीण बाज असलेल्या निमशहरी भागातील कथानक आहे. हळुवारपणे फूलणाऱ्या प्रेमकथे (Love Story) सोबतच प्रेक्षकांना उत्कंठावर्धक सस्पेन्स बघायला मिळणार आहे. ‘मजनू’ची कथा, पटकथा आणि संवाद गोवर्धन दोलताडे यांचे असून चित्रपटात नितीश चव्हाण, रोहन पाटील, स्वेतलाना अहिरे, सुरेश विश्वकर्मा, मिलिंद शिंदे, अरबाज शेख, प्रणव रावराणे, आदिती सारंगधर, माधवी जुवेकर, भक्ती चव्हाण यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत.
‘मजनू’ ला संगीतकार पी. शंकरम, सचिन अवघडे, साजन – विशाल यांचे संगीत लाभले आहे तर चित्रपटातील गीतांना इंडियन आयडॉल फेम (Indian Idol) सलमान आली, आदर्श शिंदे, संदीप उबाळे, बेला शेंडे, आनंदी जोशी व विशाल चव्हाण यांचा स्वरसाज लाभला आहे. संकलन चेतन सागडे यांचे, कला दिग्दर्शन महेश कोरे, डिओपी एम. बी.अळ्ळीकट्टी तर कोरिओग्राफर (Choreographer) हाईट मंजू आहेत. ‘मजनू’ हा चित्रपट लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.