धारुर घाटात मध्यरात्री भिषण अपघात…

किल्लेधारूर दि.३१(वार्ताहर) येथील घाटात मध्यरात्री बारानंतर दोन ट्रकचा भिषण अपघात Accident झाला असून रात्रीच पोलिसानी Police घटनास्थळी पोहोचून मदत कार्य करत वाहतूक सुरळीत केली.
घाटात अरुंद रस्त्यामुळे सतत अपघाताची Accident मालिका सुरु आहे. आज दि.३१ शनिवारी रात्री एकच्या सुमारास घाटात दोन ट्रक चा समोरा समोर अपघात Accident झाला. एक ट्रक कठड्यावर लटकला तर दुसरा डोंगराच्या दिशेने पलटी झाला. घटनास्थळी पोलीसांनी Police तात्काळ मदत कार्य केले. यात जखमी अथवा इतर हानी बाबत माहिती उपलब्ध होवू शकली नाही. मात्र सध्या कारखान्याकडे मजूर घेवून जाणाऱ्या व ऊस घेवून जाणाऱ्या वाहनांची गर्दी असुन वाहतूक सुरळीत करण्यात पोलिस Police प्रशासनाला यश आले आहे.