अखेर त्या ‘राक्षसी’ मुलाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा; माणूसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेचा निकाल.

कोल्हापूर दि.8 जुलै – पाच वर्षांपूर्वी कोल्हापूर (Kolhapur) येथे घडलेल्या थरारक घटनेतील क्रुरकर्मा मुलाच्या कृत्यावर मरेपर्यंत फाशीची शिक्षा न्यायालयाने आज ठोठावली. राक्षसी मुलगा सुनील रामा कुचकोरवी (वय 35, रा. माकडवाला वसाहत, कोल्हापूर) याने 80 वर्षाच्या आईचा अमानुष खून (Murder) करुन आईचे तुकडे तुकडे करत तेल, मीठ, चटणी लावून भाजून खाल्याची भयंकर घटना समोर आली होती. या आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे.
(After all, that ‘demon’ boy was sentenced to death; The result of an incident that tarnishes humanity.)
अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ उडवून दिलेल्या याप्रकरणी आरोपीने पाच वर्षापूर्वी आपल्या आईचा गळा दाबून खून (Murder) केला होता आणि तिच्या शरिराचे सत्तूरने तुकडे तुकडे करून तेल, मीठ, चटणी लावून भाजून खाल्लं होतं. त्याच्याविरोधात पोलिसांनी (Police) न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते. आज या प्रकरणाची सुनावणी झाली.
कोल्हापूर जिल्हा न्यायालयातील जिल्हा न्यायाधीश (District Judge) (वर्ग 4) महेश कृष्णाजी जाधव यांनी आज सुनावणी अंति सर्व पुरावे तपासून आरोपीला दोषी ठरवत मरेपर्यंत फाशीची शिक्षा आणि 25 हजार रुपयांचा दंड तसेच 6 महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.
कोल्हापूर (Kolhapur) या करवीर नगरीत अंबाबाईचे निवासस्थान आहे. मातेचा अत्यंत निर्घुणपणे खून खरून तिच्या शरिराचे तुकडे करून तेल, मीठ, चटणी लाऊन भाजून खाणाऱ्या आरोपीचे कृत्य समाज मनावर परिणाम करणारे आहे, असे निकालपत्रात न्यायालयाने (District Judge) म्हटले आहे. अशा प्रवृत्तीला कठोरतील कठोर शिक्षा दिली जाईल, असे न्यायालयाने म्हटले आहे.