एआयएमआयएम केज नगरपंचायत निवडणूक पुर्ण ताकतीने लढणार: अबुतालेब इनामदार

केजः दि.१९(प्रतिनिधी) एआयएमआयएम  (AIMIM) केज नगर पंचायतच्या सर्व जागा लढवणार असल्याची माहिती पक्षाचे शहराध्यक्ष अबूतालेब इनामदार यांनी दिली.

एआयएमआयएम (AIMIM) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार बैरिस्टर आसदुदीन ओवैसी साहेब, प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष खासदार इम्तियाज जलील साहेब, प्रदेश कार्याध्यक्ष डॉ.गफ्फार कादरी साहेब, बीड जिल्हाध्यक्ष अॅड शेख शफीक  यांच्या आदेश व सुचनेनुसार तसेच बीड जिल्हा प्रवक्ता ताथ केज नगरपंचायत निवडणूक निरीक्षक शेख रमीज, यांच्या मार्गदर्शनात केज नगरपंचायत प्रभाग क्रमांक १ ते १७ मध्ये पुर्ण ताकतीने केज शहराध्यक्ष अबुतालेब इनामदार यांच्या नेतृत्वाखाली लढणार आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी प्रभाग निहाय अर्ज एआयएमआयएम (AIMIM) पक्षाच्या  संपर्क कार्यलय रोजा मोहल्ला (हैद्राबाद बँक ) समोर केज येथे दि.२८/०२/२०२१ पर्यत सादर करावे. असे आवाहन केज शहराध्यक्ष अबुतालेब इनामदार यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!