राजकीय

Ajit Pawar आता बस्स झाले… मला विरोधी पक्षनेतेपदातून मुक्त करा – अजितदादा पवार.

54 / 100

मुंबई दि.22 जून – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या NCP वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी, पक्षात काम करत असताना संघटनेचे पद मिळत नसल्याची खंत व्यक्त करत आता बस्स झाले, मला विरोधी पक्षनेतेपदातून मुक्त करा असे विधान केल्यामुळे पुन्हा चर्चेस उधान आले आहे. Ajit Pawar … Now that’s enough… release me from the post of Leader of Opposition – Ajitdada Pawar.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये NCP इतकी वर्षे काम करत असताना पक्ष संघटनेत पद मिळत नसल्याबद्दलची खंत विरोधी पक्षनेते अजित पवार Ajit Pawar यांनी बोलून दाखवली. मला विरोधी पक्षनेतेपदात फार काही रस नव्हता परंतू आमदारांच्या आग्रहाखातर मी हे पद स्वीकारले. एक वर्ष मी विरोधी पक्षनेतेपद सांभाळले, पण आता बस्स झाले. मला विरोधी पक्षनेतेपदातून मुक्त करा आणि पक्षसंघटनेत जबाबदारी द्या, अशी मागणी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार Sharad Pawar यांच्या उपस्थितीत केली.

अजित पवार यांनी ही मागणी केल्याने शरद पवार Sharad Pawar काय निर्णय घेतात याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा अजित पवार चर्चेत आले असून अजित पवार यांनी हे विधान नेमके राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे केंद्रीय कार्यकारीणीत नव्याने खा. सुप्रिया सुळे Supriya Sule व माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांना कार्याध्यक्ष नेमल्यानंतर आले आहे. यामुळे त्यांच्या मनातील खदखद बाहेर आल्याचे सांगितले जात आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!