पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी अजित पवारांची प्रतिक्रिया…

मुंबईः दि.१२- बीड जिल्ह्यातील परळीची रहिवासी असलेल्या पूजा चव्हाण (Pooja Chavan) आत्महत्या (Suicide) प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत आहे. पूजाच्या आत्महत्येशी विदर्भातल्या एका मंत्र्याचा संबंध असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असून विरोधी पक्ष भाजपने पूजा चव्हाण प्रकरणात महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पलटवार केलाय. पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी चौकशी होऊ द्या, चौकशीनंतर काय ते समोर येईल, असं म्हणत अजित पवारांनी भाजपवर हल्लाबोल केला.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज पत्रकार परिषदेतून अनेक मुद्यांवर भाष्य केले. धनंजय मुंडेंवर ज्यांनी आरोप केला. त्यांनी नंतर स्वतः चॅनेलसमोर येऊन मी कुठल्याही दबावाला बळी न पडता माझं स्टेटमेंट करते, असं सांगितलं. एखाद्या नेत्याला राजकीय उंची गाठण्यासाठी बराच काळ-वेळ घालवावा लागतो, कष्ट घ्यावे लागतात, परिश्रम करावे लागतात. परंतु आरोप करणारा कशाही पद्धतीने आरोप करू शकतो. मग त्याही खोलात गेलं पाहिजे, असा टोलाही अजित पवार यांनी विरोधकांना लगावला. चौकशी पूर्ण होण्याच्या आधी काही लोक आरोप करतात. त्याला काही अर्थ नाही, असंही अजित पवार म्हणालेत. पहिल्यांदा त्यांनी जेव्हा आरोप केला, तेव्हा त्यावेळेस त्यांना मुद्दामहून आरोप करायला भाग पाडलं होतं का?, असे बरेच काही प्रश्न निर्माण होऊ शकतात. धनंजय मुंडेंचं प्रकरण आता मिटलं आहे. पण पूजा चव्हाण (Pooja Chavan) आत्महत्या (Suicide) प्रकरणी पोलीस (Police) विभागाकडून चौकशी सुरू आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी चौकशी होऊ द्या, पोलीस (Police) चौकशीनंतर काय ते समोर येईलच, असं अजित पवार म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!