BEED24

धारुर तालुक्यात अज्ञात इसमाची गळफास घेवून आत्महत्या.

किल्लेधारूर दि.3 नोव्हेंबर – धारूर तालुक्यात तेलगाव जवळ माजलगाव सहकारी साखर कारखान्यापासून जवळ असलेल्या कारी (ता.धारुर Dharur) शिवारात एका शेतात गळफास घेतलेल्या मृत अवस्थेत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला.
(An unknown man committed suicide by hanging herself in Dharur taluka.)

आज दि.3 नोव्हेंबर रोजी सदर घटना उघडाकीस आली आहे. सदरील प्रकार आत्महत्या (Suicide) की घातपात याबाबत अद्याप स्पष्ट झालेले नाही. माहिती मिळताच दिंद्रुड पोलीस (Police) घटनास्थळी पोहोचले आहेत. या अनोळखी व्यक्तीची ओळख पटवणे सुरू असून सदर इसमाबाबत काही माहिती असल्यास गणेश राठोड पोलीस हेड कॉन्स्टेबल दिंद्रुड पोलीस स्टेशन, मोबाईल नं.
+91 72495 22957 या क्रमांकाची संपर्क साधावा असं आवाहन दिंद्रुड पोलिसांनी केले आहे.

Exit mobile version