वृध्दाच्या अश्लिल कृत्याने बीड जिल्ह्यात संताप …

बीड दि.18 मार्च – माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथे एका 63 वर्षीय वृध्दाने 6 वर्षाच्या मुलीसोबत केलेल्या अश्लिल कृत्याचा सर्वत्र निषेध होत असून सदरील प्रकरणात गुन्हा नोंद करण्यास विलंब करणाऱ्या ठाणे अमंलदाराला निलंबित करावी अशी मागणी माजलगावच्या सामाजिक कार्यकर्त्या सत्यभामा सौंदरमल यांनी केली आहे.

(Anger over old man’s obscene act in Beed district …)

याबाबत सविस्तर वृत असे की, रविवार दि. १४ रोजी दुपारी दिंद्रुड पोलीस हद्दीतील एका गावात ६ वर्षीय मुलगी आपल्या बहिणी सोबत हपशावर पाणी भरण्यासाठी गेली होती. याचा फायदा घेत सदरील ६ वर्षाच्या मुलीवर ६० वर्षाच्या वयोवृद्धाने जिल्हा परिषद शाळेतील बाथरूम मध्ये नेत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. यावेळी पिडित बालिकेने तेथुन पळ काढत घडलेली घटना आईस सांगितली.

पिडित मुलीच्या आईच्या फिर्यादी वरुन दिंद्रुड पोलीस स्टेशनला (Police station) बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिंद्रुड पोलिस स्टेशनमध्ये माजलगाव ग्रामीण पोलिस स्टेशनच्या (Police station) स.पो.नि. प्रभा पुंडगे यांनी सदर मुलगी व आईचा जवाब नोंदवत भा.द.वि. ३५४,३५४ ए, बाल लैंगिक अपराधापासुन संरक्षण अधिनियम २०१२ कलम ८,१२ नुसार गुन्हा दाखल केला. पुढिल तपास पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल शिंदे करत आहेत. आरोपी किसन थावरे यास दिंद्रुड पोलिसांनी अटक केली असुन रविवारी घडलेल्या घटनेचा बुधवारी दिंद्रुड पोलिसांनी गुन्हा नोंदवला बाबत पंचक्रोशीत संताप व्यक्त होत आहे.

ठाणे अमंलदाराला निलंबित करा…
अंगणवाडीत असलेल्या मुलीला अश्लिल कृत्य करण्यास सांगणे अतिशय गंभीर घटना असुन घटना घडुन चार दिवसांनी गुन्हा (Crime) दाखल होण्या पाठीमागे संबंधित गावाला असलेले ठाणे अमंलदार जबाबदार आहेत. मुलीचे आई वडील दोनवेळा पोलीस ठाण्यात येऊनही गुन्हा (Crime) दाखल होण्यास उशीर केला गेला. हे त्याहुन भयानक आहे विशेष म्हणजे दिंद्रुड पोलीस ठाण्याचे निरीक्षक गव्हाणकर हे कितीही एमर्जन्सी असुद्या फोन उचलत नाहीत. यामुळे याकडे पोलीस अधिक्षकांनी लक्ष घालत संबधीत ठाणे अमंलदाराला निलंबित करावी अशी मागणी माजलगावच्या सामाजिक कार्यकर्त्या सत्यभामा सौंदरमल यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!