बीड जिल्ह्याचे कोरोना अपडेट; माजलगावात सर्वाधिक रुग्ण, पहा तालुका निहाय संख्या.

बीड दि.28 अॉक्टोबर – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज तब्बल 1358 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 10 जणांचा कोविड-19 (Covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (Positive) आला आहे. तर 1348 जण निगेटिव्ह आली आहेत. आज माजलगाव तालुक्यात सर्वाधिक पॉझिटीव्ह रुग्ण आहेत.
(Today’s Corona Update in Beed District; See what the status is.)
आजची तालुका निहाय आकडेवारी….
बीड-1, अंबाजोगाई-0, आष्टी-3, धारुर-0, गेवराई-0, केज-1, माजलगाव-5, परळी-0, पाटोदा-0, शिरुर-0, वडवणी-0 अशी आहे.
बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची (Corona Positive) दहाच्या आत असलेली संख्या काल 14 वर तर आज 10 वर आहे. काल 15 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मृत्यूची एकुण संख्या 2802 तर ॲक्टीव रुग्णांची संख्या 132 आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात 1485 नव्या रूग्णांचं (Corona Positive) निदान झालं आहे. तर 38 मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्राचा मृत्यू दर हा आता 2.12 टक्के इतका झाला आहे. दिवसभरात राज्यात 2536 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत राज्यात एकूण 64 लाख 43 हजार 342 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट हा 97.48 टक्के इतका झाला आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 22 लाख 2 हजार 811 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 66 लाख 6 हजार 536 नमुने आत्तापर्यंत पॉझिटिव्ह आले आहेत. महाराष्ट्रात 1 लाख 72 हजार 600 लोक होम क्वारंटाईन आहेत. तर 933 लोक संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. आज घडीला राज्यात 19 हजार 480 सक्रिय रूग्ण आहेत.