फेसबुक मैत्रीचा आणखी एक बळी… प्रेयसी विरुध्द गुन्हा नोंद

पुणेः दि.२८- शिक्षणाचं माहेर म्हणून ओळखले जाणारे पुणे (Pune) सध्या सोशल माध्यमातून (Social Media) होणाऱ्या फसवणूकीचे केंद्र होतय की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. किल्लेधारूर येथील एका तरुणास फेसबुक (facebook) मैत्रीतून प्रेमाच्या जाळ्यात ओढून संपत्ती बळकावण्याचा प्रयत्न एका प्रेयसीने केल्याने तरुणाने आत्महत्या (Suicide) केल्याची घटना काही दिवसांपुर्वी घडली होती. या पाठोपाठ आणखी एक असेच फेसबुक मैत्रीचे प्रकरण समोर आले असून आळंदी येथे एका तरुणाने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे.
पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या (Suicide) करणारा तरुण हा वाणिज्य शाखेच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होता. त्याच्या शेजारी राहणाऱ्या एका विवाहित महिलेने त्याला फेसबुक (facebook) या सोशल माध्यमातून (Social Media) प्रेमाच्या जाळ्यात ओढले, त्यांच्यात फेसबुक मेसेंजरद्वारे अश्लील चॅट झाले. हे सर्व प्रकरण अवघे पंधरा दिवस चालले. परंतु, माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेव असे म्हणून वीस वर्षीय तरुणाकडून विवाहित महिलेने पैशांची मागणी केली. पैसे न दिल्यास फेसबुकवरील मेसेज नातेवाईक आणि इतरांना पाठवण्याची धमकी तरुणाला देऊन पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. मात्र, या सर्व प्रकरणाला तरुण कंटाळल्याने मानसिक तणावात गेला. हा सर्व प्रकार १८ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर २०२० या कालावधीत घडला. अखेर तरुणाने आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलले. दरम्यान, आत्महत्या (Suicide) करण्यापूर्वी तरुणाने बहिणीला फोन लावून या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली. संबंधित महिला फसवत असून पैसे मागत असल्याचं देखील बहिणीला सांगितलं. त्यानंतर मात्र तरुणाने फोन बंद करून शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी आळंदी पोलीस (Police) ठाण्यात विवाहित महिले विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशाच एका फेसबुक मैत्रीतून झालेल्या धारुर येथील आत्महत्या प्रकरणातही पुणे (Pune) येथील महिलेचा पोलिस शोध घेत आहेत.