Anti-corruption … धारुर तहसीलचा लिपिक एसीबीच्या जाळ्यात.

किल्लेधारुर दि.2 जून – Anti-corruption … धारुर येथील तहसील कार्यालयात लिपिक पदावर कार्यरत असणारे महेश कोकरे यांना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने Anti-corruption Department रंगेहात पकडून कारवाई केली आहे. तालुक्यातील आसरडोह येथील स्मशानभूमीच्या नोंदीसाठी दोन हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. Anti-corruption … Clerk of Dharur Tehsil in ACB net.
धारुर तालुक्यातील आसरडोह येथील एका स्मशानभूमीची नोंद करण्यासाठी तहसील कार्यालयात लिपिक पदावर कार्यरत असणाऱ्या महेश कोकरे या कर्मचाऱ्यांने दोन हजार रुपयाची लाच मागितली होती. यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाकडे Anti-corruption Department फिर्यादी व्यक्तीने तक्रार दाखल केली होती. लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज शुक्रवारी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास सापळा रचून महेश कोकरे यास लाच स्विकारताना रंगेहात पकडले. या प्रकरणात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरु आहे. तहसील कार्यालयासह अनेक शासकीय कार्यालयात सध्या प्रभारीराज असून कामांसाठी चिरिमिरीचे प्रकार वाढले आहेत. यामुळे जनता त्रस्त आहे.