कडक लॉकडाऊन व ॲन्टीजन मोहिमेमुळे रस्ते सुनसान; मुख्याधिकारी बागुल “ॲक्शन” मोडमध्ये.

किल्लेधारूर दि.5 मे – तालुक्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या (Corona Infection) पार्श्वभूमीवर प्रशासनाने तीन दिवस लॉकडाऊन (lockdown) जाहीर केला आहे. आजपासून तीन दिवस कडक निर्बंधासह रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्यांची अँटीजन टेस्ट (Antigen Test) करण्यात येत असल्याने बऱ्यापैकी वर्दळ कमी झाली आहे. रस्त्यावर चक्क शुकशुकाट दिसत असून फिरणाऱ्यांनाही ब्रेक लागला आहे. आज यासाठी नगर परिषदेचे मुख्याधिकारी नितिन बागुल छत्रपती शिवाजी चौकात ठाण मांडुन होते.
(Roads deserted due to severe lockdown and antigen campaign; Chief Bagul in “Action” mode.)
राज्यात कोरोना संसर्गामुळे (Corona Infection) कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. मात्र याचे गांभीर्य नसलेले लोक विनाकारण बाहेर फिरून संसर्ग वाढण्यास कारणीभूत ठरत आहेत. दररोज सरासरी सत्तर ते अंशीच्या प्रमाणात तालुक्यात रुग्ण आढळून येत असल्याने आरोग्य विभागावर ताण वाढत चालला आहे. शहरातील तिन्ही कोविड सेंटर क्षमते पेक्षा जास्त भरले आहेत. तरीही लोकांमध्ये कांहीच गांभीर्य दिसत नसल्याने मोकाट फिरणाऱ्या लोकांची अँटीजन टेस्ट (Antigen Test) करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे.
आज नगर परिषदेचे मुख्याधिकारी नितिन बागुल स्वतः येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पथकासह कर्तव्यावर सज्ज होते. यावेळी रस्ते निर्मणुष्य दिसत होती. तुरळक प्रमाणात वर्दळ आढळून आली. जिलौहा प्रशासनाने आज बुधवार, गुरुवार व शुक्रवारी कडक लॉकडाऊन (lockdown) जाहिर केला आहे. याला व्यापाऱ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला. शहरातील सर्व रस्त्यावर शुकशुकाट दिसुन आला. दररोज असणारी गर्दी आज अचानक गायब झाली.
दरम्यान, शहरातील छत्रपती शिवाजी चौकात दस्तूरखुद्द मुख्याधिकारी बागुल उपस्थित राहुन ॲन्टीजन करत होते. दुपारी 3 पर्यंत 23 जणांची ॲन्टीजन चाचणी करण्यात आली होती. ज्यात एक जण पॉझिटीव्ह आढळून आला. या चौकात दोन आरोग्य कर्मचारी, नगर परिषदेचे पथक व पोलिस पथक तैनात आहे. यामुळे सडक सख्याहरींना चागलीच धास्ती बसली आहे.