राजकीय

Prakash Solanke भगवान पुरुषोत्तमाचे दर्शन करुन आमदार प्रकाश सोळंकेनी प्रचाराचा नारळ फोडला.

65 / 100 SEO Score

माजलगाव दि.5 नोव्हेंबर -Prakash Solanke पुरुषोत्तमपुरी ता.माजलगाव येथुन भगवान पुरुषोत्तमच्या चरणी नारळ फोडून महायुतीचे उमेदवार श्री. प्रकाश दादा सोळंके यांच्या प्रचाराचा शुभारंभ सादोळा व किट्टी आडगाव पंचायत समिती गणातील गावाचा कार्यकर्ता मेळावा घेऊन सुरुवात करण्यात आली.

आमदार प्रकाशदादा सोळंके यांच्या कार्यकाळात या भागात असलेले भगवान पुरुषोत्तमाच्या प्राचीन मंदिराच्या जिर्णोद्धार व विकासकामांसाठी 55 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला. तसेचं या भागातील शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने वरदान ठरलेला लोणी सावंगी उच्च पातळी बंधारा, आत्ताच ज्या कामाचा शुभारंभ झाला तो सुर्डी ते सादोळा रस्ता. या भागातील प्रत्येक गावातील प्रमुख रस्ते, विविध योजनेअंतर्गत पांदण रस्ते इत्यादी विकासकामे दादांच्या पाठपुराव्याने पूर्णत्वास गेलेले आहेत. दरवेळी प्रमाणे याही वेळी मोठ्या ताकतीने दोन्ही सर्कल दादांच्या सोबत राहतील अशी ग्वाही उपस्थित जनसमुदायाने दिली. या भव्य मेळाव्यास जयसिंगभैय्या सोळंके, जेष्ठ नेते अच्युतराव लाटे, शिवाजीभाऊ रांजवण, तुकाराम बापु येवले, अरुणराव राऊत, रविकांतजी राठोड, नितीनजी मुंदडा,जयदत्त नरवडे, संभाजी शेजुळ, राजेश घोडे, अमोल शेरकर यांच्या सह महायुतीचे नेते , सरपंच, उपसरपंच, चेअरमन, कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!