अखेर आर्यन खानला जामीन मिळाला; शनिवारपर्यंत होणार कारागृहातून सुटका.

मुंबई दि.28 अॉक्टोंबर – क्रुझवरील ड्रग्ज पार्टीप्रकरणी अखेर शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खानसह (Aryan Khan) तिघांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांना जामीन (bail) मंजूर केला आहे.

(Aryan Khan finally got bail; Release from jail till Saturday.)

न्यायालयाने तीन दिवस युक्तीवाद ऐकून घेतला आणि आता संपूर्ण आदेशाची प्रत उद्या शुक्रवारी मिळेल. आर्यनची उद्या किंवा शनिवारपर्यंत कारागृहातून सुटका होईल, अशी माहिती आर्यनच्या वकिलांनी दिली. आर्यन खानचे वकील मुकुल रोहतगी आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अनिल सिंग यांच्या सुनावणीनंतर जामीन मंजूर करण्यात आला.

न्यायालयाने अरबाज मर्चंटसाठी वकील अमित देसाई आणि मुनमुन धमेचाच्या बाजूने वकील काशिफ अली यांचीही बाजू ऐकून घेतली. एनसीबीने आर्यन, अरबाज आणि मुनमुनला 3 ऑक्टोबर रोजी (Drugs Case) अटक केली होती. क्रुझवरील आठ जणांकडे ड्रग्ज मिळालं आहे. त्यांचे व्हॉट्सअॅप चॅट्सही मिळाले आहेत. पंचनाम्यातही त्याची नोंद आहे.

काही आरोपींकडे व्यापारी प्रमाणातील व वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग्ज आढळले. तसेच हा 11 जणांचा ग्रुप क्रुझवर भेटणार होता. म्हणून ते त्यांनी व्यक्तिगत सेवनासाठी बाळगल्याचं म्हणता येत नाही. एनडीपीएस प्रकरणांमध्ये जामीन हा नियम नसतो. प्रथमदर्शनी खटला असल्यास जामीन नाकारला जाऊ शकतो, असा युक्तिवाद एनसीबीचे वकील अनिल सिंग यांनी इतर केसेसचा संदर्भ देत केला.

आरोपींना अटक करण्यापूर्वी अटकेची कारणं तपास यंत्रणेकडून सांगणं अपेक्षित होतं. मात्र, योग्य कारण न देताच अटक करून केंद्रीय अमलीपदार्थ नियंत्रण विभागाने (NCB) त्यांच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन केल्याचा दावा आर्यनसह तिघांच्या वतीने बुधवारी उच्च न्यायालयात करण्यात आला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!