खळबळजनक… केजमध्ये महाराष्ट्र बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न; चोरटे सीसीटीव्हीत कैद.

केज दि.22 फेब्रुवारी – केज (Kaij) येथे आज पहाटे 4:00 वाजण्याच्या दरम्यान कानडी रोड वरील महाराष्ट्र बँकेचे एटीएम (ATM) फोडण्याचा दोन अज्ञात चोरट्यांनी प्रयत्न केला. मात्र एटीएम मधील रक्कम चोरी करण्याचा त्यांचा प्रयत्न अयशस्वी झाला.
( Attempt to blow up Maharashtra Bank ATM in Kaij; Captured on stolen CCTV. )
या बाबत मिळालेली माहिती अशी की दि.22 फेब्रुवारी मंगळवार रोजी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास केज शहरातील मध्यवर्ती भागातील कानडी रस्त्यालगत असलेले महाराष्ट्र बँकेचे (Maharashtra Bank) एटीएम दोन अज्ञात चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरट्यांचा एटीएम फोडण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला.
एटीएमच्या सीसीटीव्ही कॅमेरा (CCTV) मध्ये ते दोन अज्ञात चोरटे कैद झाले आहेत. या प्रकाराची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक (Assistant Police Inspector) शंकर वाघमोडे यांनी घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपासासाठी पोलीस ( Police ) पथकाला पाचारण करण्यात आले असून चोरट्यांचा शोध लावण्याचे प्रयत्न सुरू केला आहे.
दरम्यान काही दिवसांपुर्वीच शहरात सोने उजळून देतो म्हणून एका वृध्देची फसवणूक झाल्याची घटना घडली होती. यानंतर चोरट्यांनी आता केज शहरात थेट एटीएम फोडण्याचा केलेला प्रयत्न चर्चेचा विषय ठरत आहे. तर शहरातील एटीएमच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.