जावायाला विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न; अंबाजोगाईतील घटना.

अंबाजोगाई दि.24 जून – पत्नीला घेऊन जाण्यासाठी सासरवाडीत आलेल्या जावयाला नातेवाइकांनी विषारी द्रव पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना अंबाजोगाई शहरातील रविवार पेठेत घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध पोलिसांत (Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करत आहेत.

(Attempting to poison Javanese; Incidents in Ambajogai.)

जयराम हनुमंत गिरी (35, रा.केज) असे जावयाचे नाव आहे. अंबाजोगाईतील रविवार पेठेत त्यांची सासरवाडी आहे. पत्नी पूजाशी वादविवाद झाल्यामुळे ती माहेरी आली होती. तिला घेण्यासाठी दि.19 शनिवार रोजी जयराम गिरी हे अंबाजोगाईला (Ambajogai) आले होते. यावेळी त्यांना ‘तू इथे का आला, आम्ही पूजाला तुझ्याकडे पाठविणार नाहीत’, असे म्हणत तीन नातेवाइकांनी लाथाबुक्क्यानी मारहाण केली.

त्यानंतर जावाई गिरी यांचे दोन्ही हात घट्ट पकडून बळजबरीने तोंडात विषारी औषध ओतले. जयराम गिरी यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले असून ते घेऊन बरे झाले आहेत. जावायाच्या जबाबावरून अप्पा माणिक गिरी, माणिक गिरी व अलका गिरी यांच्यावर अंबाजोगाई शहर पोलिसांत (Police) जीवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणून गुन्हा नोंद करण्यात आला.

सदरील मारहाण करत विष पाजण्याचा प्रयत्न (Attempting to poison) करणारे तिन्ही नातेवाईक जयराम गिरी यांचे चुलत सासरे व मावस सासू आहेत. दरम्यान, गुन्हा दाखल होताच तिन्ही आरोपी फरार झाले आहेत. या प्रकरणाचा पोलीस उपनिरीक्षक गव्हाणे पुढील तपास करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!