कोरोंना विशेषशैक्षणिक

४३ शिक्षकांसह ५५ स्वॅब अहवालाची प्रतिक्षा

शिक्षकांची धाकधूक वाढली

किल्लेधारूर दि.२०(वार्ताहर) येथील कोविड (Covid-19) केअर सेंटरमध्ये काल दि.२० रोजी ४३ शिक्षक (Teacher) व १२ संशयित रुग्णांची स्वॅब (swab) नमुने अंबाजोगाई (Ambajogai) येथील प्रयोग शाळेत पाठवण्यात आली असुन त्यांचे अहवाल आज प्राप्त होणार आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात बाधित आढळून येण्याचे प्रमाण वाढल्याने शिक्षकांचीही धाकधूक वाढली आहे.

सोमवार पासुन नववी ते बारावीचे वर्ग सुरु होत आहेत. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिकच्या शिक्षकांची कोविड-१९ (covid-19) चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. तालुक्यात एकुण २६ माध्यमिक शाळा तर ४ उच्च माध्यमिक विद्यालय आहेत. यातील २२० शिक्षकांच्या कोविड-१९ (covid-19) तपासणीचे नियोजन करण्यात आले आहे. काल दि.१९ रोजी येथील कोविड सेंटरमध्ये ४३ शिक्षकांची (Teacher) स्वॅब घेण्यात आली. तर दि.१८ रोजी ९ शिक्षकांची (Teacher) तपासणी निगेटिव्ह आली आहे. आतापर्यंत ५२ शिक्षकांच्या तपासणी झाली असून दररोज ५० शिक्षक (Teacher) याप्रमाणे नियोजन करत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी गौतम चौपडे यांनी दिली. काल कोविड सेंटरवर केवळ एक ॲन्टीजन (Antigen) चाचणी करण्यात आली होती. आज दुपारपर्यंत ४३ शिक्षकांसह १२ संशयित रुग्ण अशा ५५ जनांचे स्वॅब (Swab) अहवाल प्राप्त होणार असल्याची माहिती डॉ. तफील तांबोळी यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!