आष्टीत तलाठी तीन हजाराची लाच घेताना चतुर्भुज…. चोविस तासात दुसरी कारवाई

आष्टी दि.2 मार्च (प्रतिनिधी)- बीडमध्ये एका अधिकाऱ्यास २० हजाराची लाच घेताना पकडल्याच्या घटनेस 24 तास उलटत नाही तोच आज दि.2 मंगळवारी लाचलूचपत विभागाच्या (Anti-Corruption Bureau) जाळ्यात आष्टीत तलाठी अडकल्याची घटना घडली. बीड जिल्ह्यात वाढत्या लाचखोरीमुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. लाचलूचपत पथकाने अवघ्या चोविस तासात दुसरी कारवाई केल्याने त्यांचे अभिनंदन होत आहे.
(Ashti Talathi Chaturbhuj taking a bribe of three thousand …. Second action in twenty four hours)
बीड (Beed) येथील लेखा परिक्षण विभागात सहाय्यक संचालक पदावर असलेल्या किरण घोटकर यांच्यावर रात्री कारवाई झाली. या घटनेला 24 तास उलटत नाहीत तोच आष्टीत एका तलाठ्याला 3 हजाराची लाच घेताना बीड येथील लाचलुचपत विभागाच्या (Anti-Corruption Bureau) पथकाने रंगेहात पकडले. बाळु महादेव बनगे (रा.मुर्शदपुर ता.आष्टी) असे लाचखोर तलाठ्याचे नाव आहे. मोराळा सज्जाच्या या तलाठ्याने एका वाटणीपत्राद्वारे शेतीला नाव लावण्याच्या प्रकरणासाठी 3 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. पोलीस उपाधिक्षक बाळकृष्ण हानगुडे यांच्या पथकाने ही कारवाई आज दुपारी दि.2 मार्च केली आहे. सदरील प्रकरणात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरु आहे.
बीड (Beed) लाचलूचपत पथकाने अवघ्या चोविस तासाथा दुसरी कारवाई केल्याने त्यांचे अभिनंदन होत आहे. गेल्या महिनाभरात जिल्ह्यात लाचलुचपत विभागाकडून अनेक ठिकाणी कारवाया करण्यात आलेल्या आहेत. यात वडवणी, केज, आष्टी व माजलगाव तालुक्यातील अधिकारी जाळ्यात अडकले आहेत. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असून कारवाया होत असतानाही याला वचक बसत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सतत होत असलेल्या कारवायातून जिल्हा भ्रष्ट अधिकाऱ्यानी बरबटला असल्याची चर्चा होत आहे.